Top Newsराजकारण

अमित शाह फोडणार पुणे महापालिका निवडणुकीतील भाजपच्या प्रचाराचा नारळ

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २६ नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळतेय. अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल. यावेळी महापालिका भवनात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन होईल. तसेच पालिकेच्या नव्या इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शाह यांच्या हस्ते होणार आहे.शाह यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंच सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यासंदर्भात आज महापौर बंगल्यावर बैठक पार पडली.

पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात इतर महानगरपालिका निवडणुकी होणार आहेत. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी नगरसेवक आणि आमदारांच्या नुकतीच बैठक झाली. बैठकीत भाजपचे महाराष्ट्र युनिट अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्पांना मिशन मोडवर गती देण्याचे आणि सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारण्याचे आवाहन केले. राज्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत, भाजपने पुणे शहरातील सर्व सहा जागा जिंकल्या होत्या, तर २०१७ च्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये मध्ये जोरदार विजय मिळवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button