अमित खरे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे सल्लागार

नवी दिल्ली : बिहारमध्ये चारा घोटाळा उघड करून लालू प्रसाद यादवांना तुरुंगात पाठविण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडलेल्या माजी आयएएस अधिकाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. कॅबिनेटने नियुक्त केलेल्या समितीने आज मंजुरी दिली. अमित खरे हे मोदींचे नवे सल्लागार असणार आहेत.
मोदी सरकारने लाँच केलेल्या शिक्षण नीतिमध्ये त्यांची मोठी भूमिका राहिली आहे. उच्च शिक्षण सचिवपदावरून ते गेल्या ३० सप्टेंबरला ते निवृत्त झाले होते. पुढील दोन वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत ते मोदींचे सल्लागार राहणार आहेत. याशिवाय इंटरनेट मीडियाबाबत नियम तयार करण्यामध्येही त्यांनी योगदान दिले आहे. अमित खरे हे १९८५ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते झारखंड केडरचे होते. ३६ वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीत खरे यांनी झारखंड आणि बिहारमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनीच लालू प्रसाद यादवांना गोत्यात आणणारा चारा घोटाळा उघड केला होता. खरे यांनीच लालू यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. यानंतर बिहारचे मोठमोठ्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती.