राजकारण

औरंगाबादमध्ये स्वबळावर लढण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा : अमित देशमुख

औरंगाबाद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी काँग्रेस नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीही स्वबळाचे संकेत दिले आहेत. स्वत:चा पक्ष वाढवण्याची इच्छा प्रत्येकाला अशते. आपला पक्ष मोठा असावा असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी प्रयत्न करण्यात काही गैर नाही, अशा शब्दात देशमुख यांनी नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला पाठिंबा दर्शवला आहे.

स्वबळाच्या नाऱ्याचा गैरअर्थ काढणं चुकीचं आहे. आमच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही, असा दावाही देशमुख यांनी यावेळी केलाय. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळावर लढावं ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्याबाबतही निश्चितपणे विचार केला जाईल, असा दावाही देशमुख यांनी केलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button