
वॉशिंग्टन : काबूल स्फोटांनंतर अमेरिकेने इशारा दिल्याप्रमाणे कारवाईला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानातल्या इसिसच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला चढवला आहे. अमेरिकन ड्रोन्सनी इसिसच्या अड्ड्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. तसेच अमेरिकन नागरिकांना तातडीने अफगाणिस्तान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बुधवारी काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट झाले होते. यात १३ अमेरिकेच्या सैनिकांसह १७० लोक मारले गेले होते. . या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासान प्रोविंसनं घेतली होती. यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले होते, की अमेरिका आपल्या शत्रूंना शोधून मारेल. यानंतर ४८ तासातच अमेरिकेनं दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आहे. ठरवलेलं टार्गेट उद्धवस्त केल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.
काबूल विमानतळावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर अमेरिकेने कारवाई सुरु केली आहे. अमेरिकन ड्रोन्सनी इसिसच्या अड्ड्यांवर जोरदार मारा केला. काबूल विमानतळाजवळ झालेल्या स्फोटानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्लामिक स्टेटला (इसिस) कडक इशारा दिला होता. आत्मघातकी हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट घडवला. या हल्ल्यानंतर अमेरिकेत संतप्त झाली होती. हल्लेखोर जिवंत राहणार नाहीत, असे अमेरिकेने इशारा देताना म्हटले होते. अमेरिका इसिसच्या गुन्हेगारांना शोधून त्यांना शिक्षा करेल. दोषींचा तातडीने शोध घेऊन बदला घेऊ, असे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले होते. त्यानंतर लगेच कारवाईचे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
दरम्यान, काबूल एअरपोर्टवरही तालिबानचा शिरकाव केला आहे. मिलिट्री एरियात तालिबानी बदरी फोर्स शिरली आहे. एअरपोर्टच्या तीन महत्त्वाच्या ठिकाणांवर तालिबानने ताबा घेतला आहे. मात्र, अमेरिकेने तालिबानचा दावा फेटाळला आहे.
व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन सासाकी यांनी अशी भीती व्यक्त केली आहे, की काबूलमध्ये आणखी स्फोट होऊ शकतात. दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेनं काबूल विमानतळावरील सुरक्षा वाढवली आहे.




