
जालौन : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज उत्तर प्रदेशातील जालौन भागात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत उपस्थितांना संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांना राम मंदिर उभारलं जावं अशी अजिबात इच्छा नाही. आपलं सरकार केव्हा येईल आणि राम मंदिराच्या निर्माण कार्याला स्थगित करता येईल याचीच अखिलेश यादव वाट पाहात आहेत, असा खळबळजनक आरोप अमित शाह यांनी केला आहे.
येत्या निवडणुकीत चौकार लगावत बुआ आणि बबुआचा सुपडासाफ करण्याचा इरादा जनतेनं केला आहे. अबकी बार ३०० पार, असा नारा देखील अमित शाह यांनी यावेळी दिला. इथं बहनजी येतात आणि केवळ एकाच जातीसाठी काम करतात. अखिलेश येतात दुसऱ्या जातीसाठी काम करतात आणि निघून जातात. पण भाजप सबका साथ आणि सबका विकास करतात, असं विधान अमित शाह यांनी केलं.
अमित शाह यांनी आपल्या भाषणात मुख्यत: अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. बाबू (अखिलेश) सध्या खूपच संतापलेले दिसतात. कारण मोदींनी ट्रिपल तलाकचा मुद्दा देखील संपुषटात आला आहे. घटस्फोटाशी सरकारचा काय संबंध? मुस्लिम महिलांना अमित शाह यांनी आज पटवून दिलं.
उत्तर प्रदेशातील सर्व सहा क्षेत्रांमध्ये जन विश्वास यात्रा फिरणार आहे आणि राज्याच्या सर्व ४०३ विधानसभा जागांवर ही विधानसभा निवडणूक लढवली जाणार आहे. आज जिथं जिथं यात्रा पोहोचत आहे. तिथं खूप गर्दी जमा होते, असं अमित शाह म्हणाले.