अखिल भारतीय मराठा महासंघाच्या ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
ठाणे : मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी कित्येक वर्षांपासून अखिल भारतीय मराठा महासंघ कार्य करत आहे. या महासंघाच्या ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नवी मुंबई येथील माथाडी कामगार भवन येथे सोमवारी झालेंल्या पदनियुक्ती कार्यक्रमात नियुक्त्या करण्यात आल्या, याप्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, राष्ट्रीय चिटणीस प्रमोदराव जाधव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख, ॲड. भारती शशिकांत पाटील, प्रभारी ठाणे- नवी मुंबई उपस्थित होते.
याप्रसंगी ठाणे जिल्हा अध्यक्ष- संतोष बर्गे, ठाणे शहर अध्यक्ष- पराग मुंबरकर, ठाणे शहर उपाध्यक्ष- जयंतराज ठोंबरे, ठाणे शहर उपाध्यक्ष- अमोल कदम, ठाणे शहर सरचिटणीस- दिपक शिंदे, ठाणे शहर खजिनदार-हितेश चव्हाण, ठाणे शहर प्रसिद्धी प्रमुख – निखिल पवार, एरोली विभाग- राहुल शिंदे,
घणसोली विभाग- सुधाकर पवार, कोपरखैरणे विभाग- मारुती सकपाळ, तुर्भे विभाग- संभाजी बर्गे,
सानपाडा विभाग- हनुमंत ढोले, वाशी विभाग- घनश्याम महादेव ढमाले, महापे विभाग- अरुण पवार, नेरुळ विभाग-अभिजीत भोसले यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.