राजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नगरसेवकाकडून अजित पवारांच्या आभाराचे बॅनर्स

पुणे : पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर्स लावले आहेत. पिंपळे निलख भागातील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी शहरात विविध ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर्स लावल्याने शहरभर चर्चा सुरू झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील विविध कामांचे ठेके मिळवण्यासाठी कंत्राटदारांकडून देण्यात आलेली बँक गँरंटी बोगस निघाल्याचं प्रकरण भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी लावून धरलं होतं. तुषार कामठे यांनी पहिल्यांदा या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभेत आवाज उठवला होता. या प्रकरणी काहीच न झाल्यानं तुषार कामठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला. यामुळं तुषार कामठे यांनी अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर लावल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत. तुषार कामठे हे पिंपरी चिंचवडमधील पिंपळे निलख येथील भाजप नगरसेवक आहेत. आपण आज दाकवून दिले जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे. भ्रष्टाचार नष्ट झालाच पाहिजे मग तो भ्रष्टाचारी कोणी का असेना. अजित पवार यांच्या नि:पक्षपाती निर्णयामुळं ‘सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट’ या घोटाळेबाज कंपनीवर कुन्हा दाखल झाला आहे. त्याबद्दल दादा आपले मनस्वी आभार, असं तुषार कामठे म्हणाले आहेत.

सिक्युअर आय़टी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि या कंपनी मालकाने बनावट प्रमाणपत्रे दाखल केल्याची तक्रार भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी केल्या नंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. तत्काळ त्या ठेकेदार आणि कंपनी विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच संदर्भात त्यांनी अजित पवार यांच्या आभाराचे बॅनर्स शहरात विविध ठिकाणी लावलेत. दादा, तुमचे खूप आभार !आपण आज दाखवून दिले जे चुकीचे आहे,ते चुकीचेच आहे. भ्रष्टाचार नष्ट झालाच पाहिजे, मग भ्रष्टाचारी कोणी का असेना.

करदात्यांचे ५५ कोटी वाचवले

अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळं पिंपरी चिंचवडकरमधील करदात्यांचे ५५ कोटी वाचवले. नि:पक्षपाती निर्णयामुळे सिक्युअर आय़टी फॅसिलिटी मॅनेजमेंट या घोटाळेबाज कंपनीवर गुन्हा दाखल झाला. त्याबद्दल दादांचे मनस्वी आभार अशा आशयाचा मजकूर या फलकावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button