राजकारण

एमआयएमचा गोध्रा नगरपरिषदेत भाजपला ‘दे धक्का’

मुंबई: गुजरातमध्ये 2002 साली गोध्रा हत्याकांड झाल्यानं गोध्रा शहर चर्चेत आलं होतं. आता गोध्रा नगरपरिषदेवर एमआयएमनं अपक्षांच्या साथीनं सत्ता स्थापन केली आहे. एमआयएमनं अपक्षांना बरोबर घेत गोध्रा नगरपरिषदेतील भाजपची सत्ता हस्तगत केली आहे.

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी गोध्रामध्ये सत्ता स्थापन करणं हा ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलं आहे. वारिस पठाण यांनी भाजपकडून सत्ता खेचून आणल्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. एमआयएमनं गुजरातमध्ये गोध्रात सत्ता स्थापन करुन यशस्वी सुरुवात केली असल्याचं पठाण म्हणाले आहेत.

एमआयएमला गुजरातमध्ये चांगलं यश
गुजरातमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यामध्ये एमआयएमनं चांगलं यश मिळवलं होते. गोध्रा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला 18 , काँग्रेसला 1, एमआयएमला 7 आणि अपक्षांना 18 जागांवर विजय मिळाला होता. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी गोध्रामध्ये प्रचार देखील केला होता.

अरवल्लीच्या मोडासामध्ये एमआयएमकडे विरोधी पक्षनेतेपद
अरवल्लीच्या मोडासा नगरपालिकेत एमआयएमने 8 जागा जिंकल्या आहेत. या ठिकाणी एमआयएमने अवघे 12 उमेदवार उभे केले होते. या पैकी 8 जागा एमआयएमने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे मोडासा नगरपालिकेतील काँग्रेसकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपदही एमआयएमने स्वत:कडे खेचून आणलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या तंबूत खळबळ उडाली आहे. अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमचे 7 नगरसेवक निवडून आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button