
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाले होते. त्यानंतर १३ तास चाललेल्या चौकशीनंतर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मी मोदींना प्रणाम करतो’ या भाषेत प्रतिक्रिया दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, सगळे दरवाजे बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अटक झाली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दोषी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला शिक्षा मिळते. या कारवाईनंतर सर्वसामान्य माणूस सुखी होईल. त्यामुळे या व्यवस्थेला आणि या व्यवस्थेच्या आधारे धाक निर्माण करणाऱ्या मोदींना मी प्रणाम करतो.
अनिल देशमुख यांच्या अटकेच्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक जीवन मात्र हादरले आहे. अनिल देशमुख यांसारख्या मोठा नेत्याने समाजासोबतच द्रोह केला तर सामान्य माणसाने विश्वास तरी कोणावर ठेवायचा. या अटकेनंतर किसी को भी सहा नहीं जाएगा हा मेसेज गेला. नरेंद्र मोदींच्या भाषेत सांगायचं तर झिरो टॉलरन्स. भ्रष्टाचाराला सहन करणार नाही. प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाला असा धाक निर्माण करेल की अन्य कोणी तसे करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील संजय राठोडांचा आणि अनिल देशमुखांचा राजीनामा झाला. ज्याने महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला सुरक्षित करायचं, आश्वासित करायचं अशाच माणसाला अटक झाल्याने समाज जीवन पूर्णपणे अस्थिर झाले आहे. याचप्रमाणे बाकीचे सुद्धा जे सुपात आहेत ते जात्यात जातील आणि सर्वसामान्य माणूस आणखी आनंदी होईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना? : राम कदम
दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी अनिल देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?” असा सवाल कदम यांनी विचारला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीमध्ये त्यांचे प्रमुख बॉस कोण आहेत? वसुलीचे हिस्सेदार, वाटेकरी, कोण कोण नेते आणि पक्ष आहेत, हे समोर येईल. अर्थातच त्या बड्या नेत्यांनाही जेलमध्ये जावे लागेलच, असं राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ही लढाई कोणा एका व्यक्ति विशेषच्या विरोधातील नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. कल्पना करा. महिन्याला एका खात्यात फक्त मुंबईतून १०० कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात किती? अन सर्व खाती मोजली तर किती कोटी? हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना? अशा शब्दात राम कदम यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
परमबीर सिंग गायब होण्यात ठाकरे सरकारचा हात : आशिष शेलार
भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गायब होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. परमबीर सिंग राज्यातून पळून गेले कसे याचे उत्तर नवाब मलिक यांनी आधी द्यायला हवे, असं आव्हान शेलार यांनी मलिक यांना दिलं आहे. परमबीर सिंग पळून गेले याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. परमबीर सिंग पळून गेले मात्र त्यांचे निवासस्थान तर इथेच होते ना, असं शेलार म्हणाले. महाराष्ट्र सरकार त्यांना पळायला मदत करतंय, असा धक्कादायक आरोपही आशिष शेलार यांनी केलाय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्या देशात जातील तिथे त्यांना आश्रय मिळावा याचा प्रयत्नही राज्य सरकार करतंय असं शेलार म्हणाले. परमबीर सिंग यांच्याकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे त्यामुळेच सरकार पळायला मदत करतंय, असा दावा शेलार यांनी केला.
संजय राऊत यांच्या पत्नी आमच्या वहिनी आहेत. आम्हाला कुणाच्याही पत्नी आणि मुलांबद्दल आक्षेप नाही. माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला बदनाम करणे हा बदनामीचा कार्यक्रम राष्ट्रवादीने हाती घेतला आहे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
नवाब मलिक हे सर्वसाधारण माहिती देत आहेत. तुम्ही माहिती लपवण्यासाठी शपथ घेतली होती का? माहिती लपवण्याचे कारण काय?याचे उत्तर मलिक यांनी द्यायला हवे, असं आशिष शेलार म्हणाले. या सर्व लपवालपवीचा घटनाक्रम पाहता नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्या दोघांची नार्कोटेस्ट करावी, असंही आशिष शेलार म्हणाले. जे मंत्री सरकारची ढाल पूढे करून पोलीस यंत्रणा समोर जात नाही आहेत. कोर्टात जात नाही त्यामुळे नवाब मलिक यांची नार्कोटेस्ट करायला हवी. ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांना आणि ज्यांनी आरोप केले त्यांना समान न्याय राज्य सरकारने न्याय द्यायला हवा नाहीतर अस होईल की




