Top Newsराजकारण

पवारांवरील वक्तव्यानंतर शिवसेनेच्याच अनंत गितेंवर संजय राऊत बरसले !

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गिते यांच्यावर पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पक्षातून काही कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण गितेंच्या वक्तव्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट निशाणा साधला आहे. अशा प्रकारची वक्तव्यं कुणी करत असेल तर आम्ही दखल घेत नाही. उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांनीच सुचवलं होतं. शरद पवार हे आम्हा सगळ्यांचे नेते आहेत. बाळासाहेब आणि पवार सुद्धा एकत्रित व्यासपीठावर यायचे हे सांगतानाच संजय राऊत यांनी गितेंचं विधान पक्षशिस्तीत बसणारं नाही असंही म्हटलं आहे.

अशा प्रकारची वक्तव्यं पक्षशिस्तीत बसत नाहीत. ही पक्षाची अधिकृत भूमिका अजिबात नाही. त्यांच्या भावना असतील, पण महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्याविषयी असं बोलणं चुकीचं. कारवाई काय करायची ते उद्धव ठाकरे ठरवतील. असं म्हणत संजय राऊत यांनी गितेंच्या विधानावर थेट निशाणा साधला आहे. त्यामुळे आता या विधानावरुन गितेंना कुठल्या पक्षांतर्गत कारवाईला सामोरं जावं लागू शकतं का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button