अभिनेता अस्ताद काळेचे सरकारला खडेबोल
मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला नाकी नऊ आणले आहे. यामुळे आर्थिक स्थिती ढासाळली असून लोकांचा जीव आता मेटाकुटीला आला आहे. अनेक देशांमध्ये परत एकदा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. भारतामध्येही अनेक राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला जरी सुरवात झाली असली तरी कोरोना व्हायरसची दुसरी लाट झपाटयाने पसरत आहे. आपुर्या सोयी सुविधा अभावी अनेक रुग्ण दगावत आहेत. अशातच देशभरातून राजकारणी मंडळी आणि सरकारच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यांच्यावर सडेतोड पणे टीका होतांना दिसत आहे. दरम्यान मराठमोळा अभिनेता अस्ताद काळे याने सुद्धा सरकारच्या कारभारावर रोष प्रकट केला आहे.
अस्तादने सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर आपला राग व्यक्त करत टीका केली आहे. अस्तादने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ”प्रश्न विचारायचे आहेत…स्वत्व जपायचं आहे….कदाचित जीव गमवावा लागू शकतो…कारण..श्शु!!! कुठे काही बोलायचं नाही….अरे हाड…..आम्ही प्रश्न विचारणार….सत्तेच्या आणि सत्तेत्ल्या प्रत्येकाला….उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार……नागडे राजकारणी…नागडं सरकार…नागडा देश….निरोप घेतो….” अस्ताद च्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देशाची परिस्थिति अत्यंत बिकट झाली असून. सर्व स्तरावर याचा फटका बसत आहे. एकीकडे कडक निर्बंध लागू करून अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मात्र राजकरणी मंडळी भव्य प्रचार सभा, निवडूक रॅली काढून लोकांची गर्दी जमवत आहे. स्वत: राजकारणी मंडळी नियम पायदळी तुडवतांना दिसत आहेत. अस्तादने सरकारला धारेवर धरत आम्ही प्रश्न विचारणार अश्या प्रकारे खडेबोल सुनावले आहे