इतर

लहान मुलांसाठी विशेष ‘बाल आधार कार्ड’ अंमलात येणार 

नवी दिल्ली : देशात आधार कार्डला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, आता लहान मुलांनासुध्दा आधार कार्ड अत्यावश्यक असल्याने सरकारने लहानांसाठी बाल आधार कार्डची संकल्पना आणली आहे़. लवकरच ती अंमलात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे़. भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण (यूआयडीएआय) या आधारकार्ड बनवणाऱ्या संस्थेने लहान मुलांना आधारकार्ड बनवण्याची सुविधा दिली आहे. यानुसार तुम्ही नवजात मुलांसाठी आधार कार्डदेखील बनवू शकता. यूआयडीएआयकडून लहान मुलांसाठी निळ्या रंगाचे आधारकार्ड जारी केले जाते. याला बाल आधार (बाल आधार) असे देखील म्हणतात.

लहान मुलांचे आधारकार्ड आई-वडिलांपैकी एकाच्या आधार कार्डला लिंक केले जाते. जर तुमच्या मुलाचे वय ५ वर्षांपेक्षा कमी असेल आणि जर तुम्हाला त्याचे आधारकार्ड बनवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला यूआयडीएआय वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. बाल आधारकार्डासाठी मुलाच्या जन्माचा दाखला असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या आधारकार्डदरम्यान लहान मुलांचे कोणतेही बायोमेट्रिक तपशील घेतले जाणार नाहीत. तसेच हे आधारकार्ड आई किंवा वडिलांच्या आधारकार्डशी लिंक असणार आहे.

५ वर्षाखालील कमी वयाच्या मुलांचे बायोमेट्रिक्स आणि डोळ्यांचे पुपील विकसित झालेले नसतात. त्यामुळे लहान मुलांच्या आधार नोंदणीदरम्यान बायोमेट्रिक तपशील घेतले जात नाहीत. फक्त त्यांचे फोटो घेतले जाणार आहे. ते मूल पाच वर्षाचे झाल्यानंतर त्यांचे बायोमेट्रिक्स तपशील घेतले जातात.

बायोमेट्रिकशिवाय आधार कार्ड बनवता येणार?
असे बरेच दिव्यांग आहेत ज्यांचे हात किंवा बोट नाहीत. किंवा अनेक लोकांच्या आजारामुळे बायोमेट्रिक ट्रेसिंग येत नाहीत. अशा परिस्थितीतही आधार कार्ड बनवण्याची तरतूद आहे. बोट आणि रेटीना नसतानाही किंवा दोन्हीही नसले तरीही आपण आधारसाठी नोंदणी करू शकता. आधार सॉफ्टवेअरमध्ये असे अपवाद स्वीकारण्याची तरतूद आहे.

पाच वर्षानंतर आधार कार्ड अवैध
विशेष म्हणजे लहान मुले हे पाच वर्षाचे झाल्यानंतर निळ्या रंगाचे आधार कार्ड अवैध होते. त्यामुळे मुलाला त्याच्या आधार कार्डासह जवळच्या आधार केंद्रावर जाऊन बायोमेट्रीक करावी लागते. त्यानंतर त्याला नवीन आधार कार्ड मिळते.

बायोमेट्रिक्सचे अपडेट विनामूल्य
आधार कार्डमुळे तुमच्या मुलाला एक विशिष्ट ओळख निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही नवजात मुलाचेही आधारकार्ड बनवू शकता. विशेष म्हणजे लहान मुलांच्या आधारकार्डाचे बायोमेट्रिक्सचे अपडेट हे विनामूल्य केले जाते. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button