राजकारण

पूरग्रस्तांसाठी भाजप आमदारांचा एक पगार मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार : शेलार

मुंबई : राज्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली. आमदार आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या झालेल्या बैठकीत भाजपाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा आम्ही निर्णय आम्ही केला आहे. त्यानुसार भाजपाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्यांनांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करुन घ्यावे व पूरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत शासनाने करावी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना करीत आहोत, असं देखील म्हटलं आहे.

राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असतानाही राज्य सरकारने लादलेले निर्बंध कायम असल्याने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, नोकरदार अक्षरश: वैतागले असून हे निर्बंध तातडीने शिथिल करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. निर्बंधांना न जुमानता व्यवहार चालू करण्याशिवाय आता पर्याय नाही, अशी भावना जनमानसात वाढीस लागत आहे. याच दरम्यान भाजपाने यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button