मुक्तपीठ

चौकार – षटकार

- मुकुंद परदेशी

1) कंगना राणावतचे ट्विटर खाते कायमस्वरूपी बंद – एक बातमी
# ट्विटर खाते बंद कराल हो, पण बाईंंच तोंड कसं बंद कराल ?

2) बंगालच्या जनतेने क्रूर महिलेला निवडून केली चूक – केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रीयो
# निवडणूक निकालांचा परिणाम थेट मेंदूवर झालेला दिसतोय !

3) आता वाघ – सिहांनाही कोरोनाची लागण – एक बातमी
# आता तरी कळलं का मुख्यमंत्री घरातच का असतात ते ?

4) बंगालमध्ये हिंसाचार -एक बातमी
# बंगालमध्ये शांतता ही बातमी होऊ शकते , बंगालमध्ये हिंसाचार ही कशी बातमी होऊ शकते ?

5) निकाल लागताच ममतांची ‘ व्हील चेअर’ सुटली, आधाराविना चक्क पायावर उभ्या – एक बातमी
# निवडून आल्यावर केजरीवालांचा खोकला आणि मफलरसुद्धा असाच एकदम गायब झाला होता ?

6) अनिल अंबानी फिरायला जात असलेल्या ‘गोल्फ मैदाना’ला टाळे – एक बातमी
# बिच्चारे अंबानी ! बंगल्यावर हेलिकॉप्टर उतरवायला बंदी, मैदानावर पायी फिरायलाही बंदी !

7) मराठा आरक्षणासाठी आता केंद्रानेच मार्ग काढावा – उद्धव ठाकरे
# आड मार्गाने सत्ता मिळवता येते , पण कायदेशीर मार्गाने मराठा आरक्षण मिळविण्यासाठी केंद्राकडेच जावे लागते तर !

8) देवेंद्र फडणवीसांनी आमच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करावे – संजय राऊत
# अहो, शिस्तमंडळाचं काय घेऊन बसलात , ते तर तुमच्या सरकारचंही नेतृत्व करायला तयार आहेत !

9) मुख्यमंत्र्यांनी आता मोदींकडे फक्त आदित्यसाठी बायको मागायचीच शिल्लक ठेवली आहे – निलेश राणे यांचं ट्विट
# मोदींना मुलगी नाही , नाहीतर ते ही केलं असतं !

10) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेस सामोरे जाण्याची तयारी करा – सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्राला सूचना
# तिसऱ्या लाटेसाठी आम्ही माणसंच शिल्लक ठेवणार नाही असं प्रतिज्ञापत्रच केंद्राने सर्वोच्च न्यायालयात द्यायला काय हरकत आहे ?

11) उद्धव ठाकरेंचा आघाडीत जीव गुदमरतोय – भाजपचे माजी खासदार संजय काकडे
# सत्तेविना जीव गुदमरण्यापेक्षा सत्तेत जीव गुदमरलेला कधीही चांगला . कोरडया दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ केव्हाही चांगला !

12) मोदी सरकार राज्य सरकारला सातत्याने सापत्नभावाची वागणूक देत आहे – काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत
# अहो , ते सोडा. महाराष्ट्रातील सरकारमध्ये तुमच्याच पक्षाला सातत्याने सापत्नभावाची वागणूक दिली जाते आहे, तिकडे बघा जरा.

13) मोदी आणि हर्षवर्धन यांनी लोकांची चेष्टा चालवली आहे – माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम
# लोकांची चेष्टा करण्याचे तुमचे दिवस संपलेत , आता तुम्हीच चेष्टेचा विषय झाला आहात. सद्या त्यांचे दिवस आहेत, लोकांची चेष्टा करण्याचे . कालांतराने तेही चेष्टेचा विषय ठरतील !

14) कोरोना लढ्यासाठी मोदींकडून उद्धव ठाकरेंचे कौतुक – एक बातमी
# हा तर आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न दिसतोय ! हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागे , असं नको व्हायला !

15) विधानसभा स्वबळावर लढणार – नाना पटोले
# बंदी उठताच नानांनी मोह फुलांचा मुक्त वापर सुरू केलेला दिसतोय !

16) केंद्राने सहा महिन्यात काहीच केले नाही – ममता बॅनर्जी
# अरे व्वा ! असं कसं म्हणता ? पश्चिम बंगाल मिळविण्यासाठी किती अथक परिश्रम घेतले !

(संपर्क – ७८७५०७७७२८)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button