राजकारण

ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी; ४३ जणांची मंत्रीपदी वर्णी!

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता, ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. यावेळी ४३ नव्या चेहऱ्यांची वर्णी मंत्रीपदी लागणार आहे. अनेक नवोदितांना या मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याचा अंदाज अनेकांनीच वर्तवला आहे. ज्यामुळं काही जुन्या मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल होऊ शकतात. सकाळी १०.४५ मिनिटांनी राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार असून, डॉ. अमित मित्र आणि ब्रात्य बसू प्रकृती अस्वास्थ्यामुळं दूरदृश्य प्रणालीद्वारे शपथ घेणार आहेत.

अमित मित्रा, पार्थ चटर्जी, सुब्रत मुखर्जी, साधन पांडे, ज्योतिप्रिय मल्लिक, ब्रात्य बसू, बंकिम चंद्र हाजरा, अरूप विश्वास, मलय घटक, डॉ. मानस भुइयां, सोमेन महापात्र, उज्ज्वल विश्वास, अरूप राय, फिरहाद हकीम, रथीन घोष, डॉ शशि पांजा, चंद्रनाथ सिंह, शोभनदेव चटोपाध्याय, पुलक राय, गुलाम रब्बानी, विप्लव मित्र, जावेद खान, सपन देबनाथ आणि सिद्दिकुल्ला चौधरी यांना कॅबिनेट मंत्रीपदी नेमलं जाऊ शकतं.

बेचाराम मन्ना, सुब्रत साहा, हुमायूं कबीर, अखिल गिरी, चंद्रिमा भट्टाचार्य, रत्ना डे नाग, संध्यारानी टुडू, बुलू चिक बराई, सुजीत बोस आणि इंद्रनील सेन यांना स्वतंत्र प्रभारी (राज्य मंत्री) ची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. याशिवाय दिलीप मंडल, अखरूज्जमां, शिउली साहा, श्रीकांत महतो, जसमीन शबीना, वीरवाहा हांसदा, ज्योत्सना मंडी, मनोज तिवारी, परेशचंद्र अधिकारी यांचीही नावं पुढं येत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूलच्या वाट्याला २१३ जागांवर यश मिळालं. तर, भाजपच्या खात्यात ७७ जागा गेल्या. याच निकालाच्या धर्तीवर तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी ५ मे रोजी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्व सूत्र पुन्हा एकदा आपल्या हाती घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button