मनोरंजन

‘स्टार प्रवाह’वर ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ मराठीतून पाहण्याची संधी

मुंबई : मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल धमाका घेऊन येणार आहे. अजय देवगण यांची निर्मिती असलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा सिनेमा पहिल्यांदाच मराठीतून पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. तानाजी मालुसरे हे इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षराने कोरलेलं नाव. या शूरवीराने जीवाची पर्वा न करता कोंढाणा सर केला. तानाजी मालुसरेंच्या या शौर्याची गाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमातून दाखवण्यात आली आहे. हा दैदिप्यमान इतिहास आपल्या मातृभाषेत पाहायला मिळणं ही पर्वणीच म्हणायला हवं. मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या आणि नंबर वन हे बिरुद कायम राखणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर २३ एप्रिलला दुपारी १२ वाजता हा सिनेमा मराठीतून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

या भव्यदिव्य सिनेमाविषयी सांगताना स्टार प्रवाह कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आपल्या मायबोली मराठीमध्ये हा सिनेमा स्टार प्रवाहवर प्रक्षेपित करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. प्रेक्षकांसाठी ही अनोखी पर्वणी स्टार प्रवाह वाहिनीने आणली आहे.’

अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्यासोबतच अजिंक्य देव, शरद केळकर, देवदत्त नागे आणि दिग्दर्शक ओम राऊत अशी अनेक मराठी नावं या सिनेमासोबत जोडली गेली आहेत. कलाकारांच्या उत्तम अभिनयासोबतच सिनेमातली दमदार गाणी, अजय-अतुल यांचं काळजाला भिडणारं संगीत आणि डोळे दिपवणारे व्हीएफएक्स हे सारं प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे. तेव्हा २३ एप्रिलला दुपारी १२ वाजता ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमाचा मराठीतून आस्वाद घ्यायला विसरु नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button