Uncategorizedफोकसराजकारण

ठाण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या प्रभागात धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला; दोन जण जखमी

धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

ठाणे (खास प्रतिनिधी) : ठाण्यातील किसन नगर परिसरात इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. हा परिसर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभा मतदार संघातील आहे, या प्रभागात अनेक इमारती धोकादायक आहेत. परंतु इमारती धोकादायक असून देखील या ठिकाणी नागरिक राहत असल्याने अशा घटना घडण्यास यंदाच्या पावसाळयात सुरुवात झाली आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात क्लस्टर योजना सुरु केली पण किसन नगर परिसरात आजही नागरिक धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत, या किसन नगर परिसरातील किती धोकादायक इमारतींना ठाणे महानगरपालिकेने नोटिसा दिल्या आणि धोकादायक इमारत असून देखील नागरिकांना इमारतीमधून का दुसऱ्या ठिकाणी का शिफ्ट केले नाही ? हाच प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.

ठाण्यातील कोपरी -पाचपाखाडी मतदार संघातील तिवारी भवन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गॅलरीचा काही भाग शनिवारी रात्री ११च्या सुमारास पडला यामध्ये दोन व्यक्तींना दुखापत झाली. तिवारी भवन इमारत तळ + २ मजली + १- टेरेस फ्लॅट / अंदाजे ४५ वर्षे जुने बांधकाम आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रूम नंबर ०१, मालक – सुरेश पांचाल हे आहेत घटना घडली तेव्हा रूम बंद होता. या रूम समोरील गॅलरीचा काही भाग कोसळला असून उर्वरित भाग धोकादायक स्थितीत झाला आहे. दुर्घटनेमध्ये नुरी इस्लाम शेख वय- ६५ वर्षे, राहणार – शर्मा डॉक्टर गल्ली, किसन नगर नंबर -२, वागळे इस्टेट, सदर व्यक्तीवरती गॅलरीचा काही भाग पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला, खांद्याला व पायाला दुखापत झाली होती. सदर व्यक्तीला स्थानिक नागरिकांकडून जवळील अष्टविनायक हॉस्पिटल, किसन नगर नंबर -२, वागळे इस्टेट येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. तर सुरेश थापा, वय- ३६ वर्षे, राहणार – शंकर सोसायटी किसन नगर नंबर -२, वागळे इस्टेट, सदर व्यक्तीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

तिवारी भवन या इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला यामुळे उर्वरित भाग धोकादायक स्थितीत असल्याने सदरची इमारत पूर्णतः रिकामी करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्याकडून सुरक्षतेच्या कारणास्तव धोकापट्टी बांधण्यात आली आहे तसेच गॅलरीचे रॅबिट रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button