इतर

अँटिलिया स्फोटके प्रकरणात ८ वी गाडी जप्त

आणखी एका इको कारचा एनआयएकडून शोध

मुंबई : अँटिलियाजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांनी वापरलेल्या ८ हून अधिक कार जप्त केल्या आहेत. या गाड्यांची फॉरेन्सिक तपासणीही केली जात आहे. पण एनआयए एका इको कारच्या शोधात आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये ही इको कार औरंगाबाद येथून चोरीला गेली होती. चोरीनंतर या गाडीची कोणतीही माहिती नव्हती. मात्र मिठी नदीत शोध घेत असताना एनआयएला एक नंबर प्लेट मिळाली. ही नंबर प्लेट औरंगाबादमध्ये चोरीला गेलेल्या इको कारची होती.

इको कार फेक एन्काऊंटरच्या उद्देशाने चोरली असल्याचा एनआयएला संशय आहे. ती चोरी केल्यानंतर सचिन वाझे ही इको कार वापरत होते. एवढेच नव्हे तर या वाहनाची नंबर प्लेटही बदलण्यात आली होती. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर 2020 रोजी इको कार चोरीला गेली होती आणि त्यानंतर ती वापरली जात होती. सुरुवातीला सचिन वाझे अँटिलिया स्फोटकं प्रकरणाचा तपास करत होते. या इको कारमध्ये दोन लोकांचा एन्काऊंटर करण्याचा कट होता. इको कारमध्ये दोन लोकांच्या एन्काऊंटरनंतर अँटिलिया स्फोटकं प्रकरण सोडवण्याचा आणि दोघांचा एन्काऊंटर केल्यानंतर वाहवा मिळवण्याचा कट रचला गेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दोघांचा एन्काऊंटर केला जाणार होता, त्यातील एक जण मुबंई आणि दुसरा दिल्लीचा होता.

मुंबईतील अँटिलियाजवळ स्कॉर्पिओमधील स्फोटक प्रकरणाची चौकशी करताना मिठी नदीत एनआयएला नंबर प्लेट सापडली होती, ती कार औरंगाबादची आहे. एनआयएच्या पथकाला मिठी नदीत कारची नंबर प्लेट सापडली तिचा नंबर MH 20 FP 1539 असल्याचे आढळले. नंबर प्लेट विजय मधुकर नाडे यांच्या मारुती इको कारची होती. त्यांचा पत्ता छत्रपती नगर, हडको NH 12, औरंगाबाद असा आहे. विजय नाडे हे जालना येथील समाज कल्याण विभागात लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ही इको कार 16 नोव्हेंबर 2020 रोजी उद्धवराव पाटील चौकातून चोरी झाली. याबाबत सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारची चौकशी केली नाही असा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

मनसुखची हत्या करण्यासाठी वाझेंनी केला लोकलचा प्रवास,!

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे सोपवण्यात आला असला तरी रोज या प्रकरणात मृत्यू प्रकरणात रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. रोज नवीन खुलासे होत आहेत, असाच एक खुलासा समोर आला आहे. लोकलच्या गर्दीत ओळख पटणे कठीण असल्याने वाझे मोबाईल ऑफिसला ठेवून ठाण्याला लोकलनं गेल्याचे तपासात समोर आले आहेत. लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून वाझेंनी हे मोबाईल कार्यालयात ठेवून एका मिञाला तो उचलण्यासाठी ही ठेवले होते. जर कोणाचा फोन आल्यास साहेब कामात असल्याचा मेसेज देण्यास त्याला सांगितले होते.

दरम्यान वाझे सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर 7 च्या सुमारास CCTVमध्ये कैद झाले आहे. त्यानंतर तो ठाणे स्थानकाबाहेर दिसले. पुन्हा लोकलनेच प्रवास करून ते भायखळाला उतरून बारवर रेड करण्यासाठी गेले. ज्यावेळी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत त्यांचा मोबाईल घेऊन येण्यास सांगितले. जेणेकरून ते सर्व लोकेशन एकञ दिसतील आणि वाझेंवर कुणाला संशयही येणार नाही. माञ एनआयएने हिरण हत्या प्रकरणात कुणा कुणाचा सहभाग आहे. त्या दिवशी कोण घटनास्थळी कोण होते. वाझेंचा रोल त्यात काय याचा तपास करत आहे. हिरण यांची हत्या ही गायमुख जवळील परिसरात केल्यानंतर त्यांचा मृतदेह हा मुंब्रा खाडी परिसरात टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माञ शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरही आता रडारवर आहेत. गंभीर गुन्ह्यातील हिरण ही संशयित व्यक्ती असताना त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन व्हिडिओ रेकॉर्डिंग का केलं नाही. शवविच्छेदनावेळी डॉक्टरांनी वाझेंची भेट का घेतली. नेमकी त्यांच्यात काय चर्चा झाली. याची माहिती एनआयए घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button