Top Newsफोकस

वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली ! अपघातात मेडिकलच्या ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

वर्ध्याजवळ भीषण दुर्घटना; मृतांमध्ये आमदार पुत्राचा समावेश

वर्धा : मंगळवारची सकाळ एक भीषण बातमी घेऊन आली. मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा वर्ध्यातील कार (अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात कार तब्बल चाळीस फूट खोल नदीत पडली. कारमधील सातही जण अपघातात जागीच ठार झाले. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती, की कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागला. नदीच्या पुलावर असलेला संरक्षक कठडा तोडून कार थेट खाली कोसळली होती. यात कारचा चक्काचूर झाला होता. सर्व विद्यार्थी २५ ते ३५ वयोगटातील असल्याची माहिती आहे. यामध्ये गोंदियातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले याचाही समावेश आहे.

वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला हॉस्टेलच्या बाहेर पडलेल्या या विद्यार्थ्यांना आपण पुन्हा जिवंत परत येऊ शकणार नाही, अशी निघताना पुसटीशी कल्पना नसेल. सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडलेल्या मेडिकल कॉलेजमधील सात मित्रांच्या महिंद्रा एक्सयूव्ही कारचा नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला.

वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला हॉस्टेलच्या बाहेर पडलेल्या या विद्यार्थ्यांना आपण पुन्हा जिवंत परत येऊ शकणार नाही, अशी निघताना पुसटीशी कल्पना नसेल. सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडलेल्या मेडिकल कॉलेजमधील सात मित्रांच्या महिंद्रा एक्सयूव्ही कारचा नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी हे हॉस्टेलमध्ये राहत होते. रात्री १० वाजता हॉस्टेलमध्ये हजेरी घेतली जाते. तेव्हा विद्यार्थी हॉस्टेलमध्ये नसल्याचं लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना याची कल्पना देण्यात आली होती. दरम्यान, वाढदिवस साजरा करण्याच्या हेतून आपण बाहेर आलो असल्याचं विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांना कळवलं होतं. फोनवरुन सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना याबाबत सांगण्यात आलं होतं. रात्री १० वाजता हॉस्टेल विद्यार्थी न आल्यामुळे हॉस्टेलमधील वरिष्ठांनाही काळजी लागून राहिली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचा कोणताच थांगपत्ता न लागल्यानं सर्वच चिंतेत होते. अखेर पहाटेच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या भीषण अपघाती मृत्यू बातमी येऊन धडकल्यानं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.

सावंगी मेडिकल कॉलेजच्या कार्यालय प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त एक जण महाराष्ट्रातला होता. महाराष्ट्रातील तिरोड्याचे आमदार रहांगडाले यांचे सुपुत्र आविष्कार रहांगडाले याचाही या अपघातात मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. अपघातातील फक्त एक विद्यार्थी महाराष्ट्रातला तर तीन विद्यार्थी हे उत्तर प्रदेश आणि दोन बिहारचे होते, अशी माहिती त्यांनी दिली. तर एक विद्यार्थी हा ओदिशाचा होता.

सातपैकी एक विद्यार्थी हा इंटर्न होता. दोन फायनल इयरचे विद्यार्थी होते. तर दोन मधल्या वर्षांचे विद्यार्थी होते. गाडी चालवणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव नीरज सिंह होतं, अशी माहिती अभ्युदय मेघे यांनी दिली आहे. नीरजचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात घडल्याचं सांगितलं जातंय. नदीवरील पुलाचा कठडा तोडून कार थेट चाळीस फूट खाली कोसळली आणि यात सातही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षाचे दोन विद्यार्थी गाडीत होते. या विद्यार्थ्यांमध्ये भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले आणि आणखीन एक विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याचं नाव पवन शक्ती असं असल्याचं म्हटलंय.

या अपघातात ठार झालेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची ओळख पटली असल्याचीही माहिती सावंगी मेडिकल कॉलेजच्या ओएसडींनी दिली आहे. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. आपला मुलगा भविष्यात डॉक्टर होणार आहे, असं स्वप्न सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिलं होतं. मात्र सोमवारच्या काळरात्री या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान या अपघातातील सातही विद्यार्थ्यांच्या मृत्यूनं संपूर्ण मेडिकल कॉलेजही हादरुन गेलं आहे.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अन्य सहा जणांची नावे – नीरज चौहान (प्रथम वर्ष एमबीबीएस), नितेश सिंग (इंटर्न एमबीएएस), विवेक नंदन (एमबीएबीएस फायनल पार्ट १), प्रत्युश सिंग (एमबीबीएस फायनल पार्ट २), शुभम जयस्वाल (एमबीबीएस फायनल पार्ट २), पवन शक्ती (एमबीबीएस फायनल पार्ट १)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button