फोकस

७.२ तीव्रतेच्या भूकंपाने हैती हादरले; आतापर्यंत २२७ जणांचा मृत्यू

पोर्ट-अउ-प्रिंस : १० वर्षानंतर कॅरेबियन देश हैती भूकंपाने हादरले. या भूकंपात हैतीमधील अनेक शहरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हैतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, या भूकंपात आतापर्यंत २२७ नागरिकांचा मृत्यू झालाय तर शेकडो जखमी आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हैतीचे नागरिक सुरक्षा संचालक जेरी चांडलरने सांगितल्यानुसार, भूकंपामुळे जेरेमी, लेस केयस, सेंट लुइस डू सूद आणि लेस एंग्लिस शहरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरे जमीनदोस्त झाल्यामुळे शेकडो लोकांचा संसार उघड्यावर पडलाय. नॅशनल सेंटर ऑफ सीस्मोलॉजीने या भूकंपाची तीव्रता ७.२ रिश्टर स्केल असल्याची माहिती दिली आहे. तर, भूकंपाचे केंद्र पोर्ट-औ-प्रिंस पासून पश्चिम दिशेकडे ११८ किलोमीटर दूरवर आहे.

दरम्यान, हैतीमधील भूकंपादरम्यान तिकडे अमेरिकेतील अलास्कामध्येही ६.९ तीव्रतेचे भूकंपाचे हदरे जाणवले आहेत. अलास्कात सायंकाळी ५.२७ वाजता भूकंप आला. पण, अद्याप कुठल्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. तर, तिकडे पूर्व क्यूबा आणि जमैकामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button