अर्थ-उद्योग

२८ व्या ‘कन्व्हर्जन्स इंडिया आणि ६ व्या स्मार्ट सिटीज इंडिया एक्सपो’चे आयोजन

मुंबई : भारतातील सर्वात मोठा तंत्रज्ञान व इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपो २८ वा कव्हर्जन्स इंडिया आणि ६ वा स्मार्ट सिटीज इंडिया २०२१ एक्सपो- इंडस्ट्रीतील संस्थापकांना राष्ट्र उभारणी, वृद्धीकडे वाटचाल आणि नव्या बिझनेस संधीच्या दिशेने कार्य करण्याकरिता चर्चा करण्याकरिता आमंत्रित करण्यात येत आहे. २४ ते २६ मार्च दरम्यान प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणा-या या एक्स्पोमध्ये डिजिटल व स्मार्ट इंडियाच्या निर्मितीसाठी ईव्हीएस आणि वित्तीय सेवांपासून कागदोपत्री माहिती पासून स्मार्ट कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत सर्वकाही प्रदर्शित होणार आहे.

महामारीमुळे २०२० या वर्षात जगाचे चित्र पालटल्यानंतर, अशा प्रकारचा अर्थपूर्ण इन-पर्सन बी२बी एक्स्पो पहिल्यांदाच होत आहे. भारतातील या सर्वात मोठ्या टेक व इन्फ्रा एक्स्पोमध्ये पिअॅजिओ व्हेइकल्स प्रा.लि., माझार्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड, एलजी एलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेड व इतर अनेक लीडर्सचा सहभाग आहे.

इंडस्ट्रीतील संस्थापक तज्ञ २८ व्या कन्व्हर्जन्स इंडिया व ६ व्या स्मार्ट सिटीज इंडिया एक्स्पोमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोल्युशन्सचे प्रदर्शन करतील. नव्या वाटांवरील उपक्रमांवर एक्स्पो व कॉन्फरन्समध्ये चर्चासत्र होतील. तसेच शाश्वत भारतातील सामाजिक-आर्थिक वृद्धीकरिता शाश्वत उपाययोजनांसाठी इथे प्रोत्साहन दिले जाईल.

नेटवर्कमधील स्टेकहोल्डर्स वैयक्तिकरित्या अनेक गोष्टींवर एक्स्पोमध्ये चर्चा करतील. यात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, इंटेलिजंट होम ऑटोमेशन, फिनटेक क्षेत्रातील नूतनाविष्कार, स्मार्ट मोबिलिटी, रस्ते सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा, स्वच्छ व निरोगी भारत, क्लाउड कंप्युटिंग तसेच डिजिटल क्षेत्रातील नवोदित ट्रेंड्स व तंत्रज्ञान आदी विषयांचा समावेश असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button