अर्थ-उद्योग

कार्वीची अकरा लाख गोठवलेली खाती पुन्हा सक्रिय होणार

पुणे : भारतातील आघाडीची ब्रोकिंग व ॲडव्हायझरी कंपनी आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेडने घोषणा आहे केली की अकरा लाख गोठवलेले कार्वी डिमॅट खाती आता आयआयएफएलच्या व्यासपीठावर ट्रेडिंग व गुंतवणूक करु शकतात. आयआयएफएल सिक्युरिटीजने राष्ट्रीय सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लि.कडे कार्वी स्टॉक ब्रोकिंगची सर्व डीमॅट खाती अधिग्रहित करण्यासाठी अधिकृत बोली जिंकली आहे.

कार्वीच्या ११ लाख डिमॅट खात्यांच्या व्यवस्थापन अंतर्गत ३ लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीस कार्वीची डीमॅट खाती अधिग्रहित करण्यासाठी अधिकृत बोली प्रक्रिया सुरू झाली होती

आयआयएफएल सिक्युरिटीजने कर्वीच्या डीमॅट खातेदार ग्राहकांसाठी समर्पित वेब प्लॅटफॉर्म व दूरध्वनी क्रमांक ०२२ ४००७५००० सुरु केला आहे. यामुळे कार्वीच्या डीमॅट खातेदार खातीदार ग्राहकांना आपली खाती परत सक्रिय करण्यास मदत् होईल. . गेल्या एका वर्षापासून कार्वीची डिमॅट खाती गोठविली गेली होती. आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेडने कार्वी स्टॉक ब्रोकिंगची सर्व डीमॅट खाती अधिग्रहित केल्यामुळे कर्वीच्या डीमॅट खातेदारांना दिलासा मिळेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button