कोरोनाचा मोठा तडाखा! देशात २४ तासांत २ लाख ७३ हजार ८१० नवे रुग्ण

नवी दिल्ली : कोरोना विषाणू वाऱ्यासारखा पसरत असून देशातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्यमुळे आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडून पडली आहे. यात देशात २४ तासांत अडीच लाखाहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. भयावह बाब म्हणजे देशात वाढत्या रुग्णसंख्येबरोबर मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी एका दिवसात कोरोनामुळे दीड हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना अत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक नाहीत, मृतदेहांच्या रांगा अनेक ठिकाणी पाहयला मिळत आहेत. त्यामुळे महामारीचे संकट देशावर आणखी गडद होत असल्याचे चित्र आहे. केंद्रीय आरोग्या विभागाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोना स्थिती अगदी गंभीर आहेत.
देशात गेल्या २४ तासांत २ लाख ७३ हजार ८१० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ६१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही आकडेवारी अक्षरश: धडकी भरवणारी असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. देशात गेल्या २४ तासांत १ लाख ४४ हजार १७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशांत आतापर्यंत १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर सध्या देशात १९ लाख २९ हजार ३२९ Active केसेस आहेत. तर आतापर्यंत १ कोटी २९ लाख ५३ हजार ८२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत १ लाख ७८ हजार ७६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १२ कोटी ३८ लाख ५२ हजार ५६६ जणांनी लस घेतली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.




