आरोग्य

ठाण्यात कोरोनाचे १६ हॉटस्पॉट; ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन

ठाणे : ठाण्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असले तरी, येथे कोरोना संसर्गावर म्हणावे तेवढे नियंत्रण मिळवता आलेले नाही. सध्या ठाणे (Thane) शहरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असून येते तब्बल 16 ठिकाणं कोरोना हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता खबरदारी म्हणून या 16 ठिकाणीी 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याविषयी महापालिकेने अध्यादेश काडून त्याची याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.

ठाणे शहरात अनलॉकनंतर सर्वकाही आलबेल झाले असतानाच कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली. सध्या ठाण्यात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.अशाच प्रमाणात रुग्णांचा संसर्ग वाढत गेला तर आगामी काळात कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रात 16 ठिकाणं कोरोना हॉटस्पॉट (प्रतिबंधित क्षेत्र ) निश्चित केली आहेत. त्यामुळे आता कोरोनाला अटकाव करण्यासाठी या 16 हॉटस्पॉटमध्ये येत्या 31 मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाऊन असेल. तशी माहिती ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.

कळवा प्रभाग समिती क्षेत्रात विटावा, आईनगर, सुर्यनगर, खारेगाव परिसर हा भाग हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तर, परिमंडळ दोनमध्ये चेंदणी कोळीवाडा, वागळे आणि श्रीनगर हा भाग कोरोना हॉटस्पॉट आहे. परिमंडळ 3 मध्ये सर्वाधिक हॉटस्पॉट असून यात माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील बाळकुम, लोढा, लोढा आमारा, हिरानंदानी इस्टेट, हिरानंदानी मेडोज गृहसंकुले या भागाचा समावेश आहे. लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात दोस्ती विहार, शिवाई नगर, कोरस टॉवर, कोलबाड, रुस्तुमजी हा परिसरसुद्धा हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. हॉटस्पॉट वगळता ठाण्यातील बाकीच्या परिसरातील व्यवहार राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार चालतील.

औरंगाबाद शहरात लॉकडाऊन
राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तसेच 11 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान शहरातील सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आणण्यात आली आहे. या दरम्यान लग्न समारंभावरही बंदी आणण्यात आली आहे.

केंद्रीय पथकाचा अहवाल
कोरोना संपला असं समजून लोकांचा वाढलेला निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ आणि लोकलसह सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु करणे अशा काही गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असं केंद्रीय पथकाने स्पष्ट केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लोकलमधील गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात म्हटलं आहे. आरोग्य यंत्रणा देखील आता खूप गांभीर्याने काम करत नसल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपुण विनायक यांच्यासह तीन जणांच्या पथकाने 1 आणि 2 मार्च रोजी हा कोरोना पाहणी दौरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button