राजकारण

मुंबईतील भाजपचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर; यशवंत जाधव यांचा दावा

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अशावेळी मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. डिसेंबरमध्ये मुंबईत राजकीय भूकंपाचे संकेत जाधव यांनी दिले आहेत. भाजपचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेते प्रवेश करणार आहेत. पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळलेले नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

मी एक सांगतो आहे की, मुंबई महापालिकेत असलेले भाजपचे काही नगरसेवक निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाला कंटाळले आहेत. नेतृत्वाचा मनमानी कारभार, त्यांना कुठेही विचारात न घेणं, त्यांना डावलणं, यातून त्यांची निराशा होत आहे. परिणामी अशी मंडळी निश्चितपणे वेगळा विचार करत आहेत. त्याचा जो निकाल आहे तो डिसेंबरला मुंबई शहराला कळेल. भाजपची ही मंडळी शिवसेनेच्या संपर्कात आहेत. जे नेतृत्व आहे ते त्यांना जुमानत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचा आधार वाटतोय, असा दावा यशवंत जाधव यांनी केलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button