राजकारण

निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर यांचा लवकरच काँग्रेस प्रवेश?

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेनं जोर धरला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची गेल्या महिन्यात तीनवेळा भेट घेणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि वरिष्ठ नेते वेणुगोपालदेखील उपस्थित होते. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे आव्हान उभे करणे आणि देशातील प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसची मोर्चेबांधणी करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबतच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला तोडीसतोड आव्हान देण्यासाठी आणि देशातील प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसची मोर्चेबांधणी करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबतच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रशांत किशोर यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी चर्चेत प्रियांका आणि सोनिया गांधी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अशी चर्चा काही पहिल्यांदाच झालेली नाही असंही सांगण्यात येत आहे.

प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबियांमध्ये झालेली बैठक आगामी पंजाब किंवा उत्तर प्रदेश विधानसभेच्या मुद्द्यावरुन नसून त्याहूनही मोठी चर्चा या बैठकीत झाल्याचं सांगण्यात येत आहे. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांना काँग्रेसकडून मोठी भूमिका दिली जाण्याची शक्यता असल्याची चिन्हं आहेत.

प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांची भेट २०१७ साली उत्तर प्रदेश निवडणुकीवेळी झाली होती. पण त्यावेळी किशोर यांच्या रणनितीला यश आलं नव्हतं. काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button