हास्यामध्ये रहस्यमय भर : ‘जीजाजी छत पर कोई है’
सोनी सबवर ८ मार्चपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता
मुंबई : कॅलेंडरवर तारखेची नोंद करून ठेवा, अलार्म्स लावून ठेवा आणि सोनी सबच्या जीजाजीच्या विश्वाच्या विलक्षणतेचे पुन्हा एकदा स्वागत करण्यास सज्ज राहा. मालिका नवीन अवतारामध्ये परतत आहे, पण यावेळी मालिकेचे नाव आहे ‘जीजाजी छत पर कोई है’. जीजाजी कुटुंब सोनी सबवर परतत आहे, पण यावेळी त्यांच्या विश्वामध्ये भयावह गोष्टींची भर करण्यात आली आहे, ज्या रोजच्या हास्यासह तुमचा थरकाप उडवतील.
मालिका ‘जीजाजी छत पर कोई है’ जल्दीराम व जिंदाल या दोन कुटुंबांमधील प्राचीन काळापासूनच्या कौटुंबिक वादाची क्लासिक कथा आहे. हे दोन्ही कुटुंबे वडिलोपार्जित संपत्तीवर त्यांचा दावा करतात. संपत्तीसंदर्भातील वादामुळे दोन्ही कुटुंबे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी एक रहस्य आहे, जे या पुश्तेनी हवेलीच्या तहखान्यामध्ये लपलेले आहे. या हास्यजनक वादविवादामध्ये जल्दीराम व जिंदाल यांचे स्वत:चे व्यवसाय रेस्टॉरण्ट व गॅरेज प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी सतत भांडणं होतात.
मालिका ‘जीजाजी छत पर कोई है’मध्ये मोहक हिबा नवाब जल्दीरामची प्रेमळ मुलगी सीपीच्या (कॉनॉट प्लेसचे संक्षिप्त रूप) भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत धडाकेबाज शुभाशिष झा जितेंद्र जामवंत जिंदाल ऊर्फ जीजाजीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. अधिक विलक्षणता व हास्याचा आनंद मिळणार आहे, जेथे मालिका प्रतिभावान कलाकारांनी साकारलेल्या रोमांचक पात्रांसह प्रेक्षकांना मनोरंजनाचा आनंद देणार आहे.
या जीजाजी फ्रँचायझीसोबत पुनरागमन करत आहे अनुप उपाध्याय, जो जल्दीराम स्वीट्सचा मालक जल्दीरामच्या भूमिकेत दिसणार आहे, तर बडबडी व उत्साही सोमा राठोड जल्दीरामची पत्नी सोफियाच्या भूमिकेत दिसणार आहे. जल्दीरामचा वकिल असण्यासोबत सोफियाच्या भावाची भूमिका फिरोज खान साकारणार आहे. अत्यंत मोहक राशी बावा जल्दीराम स्वीट्समध्ये काम करणा-या वेट्रेसची भूमिका साकारणार आहे. या स्टार कलाकारांमध्ये काही नवीन चेहरे देखील असणार आहेत जसे जीजाजीचे वडिल नन्हेच्या भूमिकेत जितू शिवहरे, बिजलीदेवी ऊर्फ जीजाजीच्या आईच्या भूमिकेत सुचेता खन्ना आणि नन्हे व बिजलीदेवीचा दत्तक घेतलेला मुलगा गुलजारच्या भूमिकेत विपीन हिरो.
या मालिकेच्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांसोबत सखोल नाते निर्माण केले. ‘जीजाजी छत पर कोई है’चे लाँच हे त्यांच्या प्रेमाचा पुरावा आहे. प्रेक्षकांनी केलेल्या मागणीमुळेच मालिका परतली आहे. नवीन मनोरंजनपूर्ण पटकथा, विलक्षण पात्रं आणि पूर्णत: नवीन रहस्यमय घटक असलेली मालिका पुन्हा प्रेक्षकांना आवडेल. वर्ष २०२१ ची सुरूवात आमच्यासाठी उत्साहात झाली आहे. ‘वागले की दुनिया’ मालिकेवर सर्व स्तरातील प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. माझा विश्वास आहे की ‘जीजाजी छत पर कोई है’ सोनी सबच्या संपन्न कन्टेन्टमध्ये अधिक भर करेल, असे सोनी सबचे व्यवसाय प्रमुख नीरज व्यास यांनी सांगितले.