सर्वसमावेशक आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमाच्या साथीने ईटऑनतर्फे महिलांना विज्ञानात प्रोत्साहन
मुंबई : ईटऑन ही जागतिक दर्जाची ऊर्जा व्यवस्थापन कंपनी आहे, ही महिलांना STEM करीयर (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) मध्ये साह्य करते. त्यांना शिष्यवृत्ती कार्यक्रमात मार्गदर्शन उपलब्ध करून देते. ईटऑनच्या उपक्रमांचा भर विद्यार्थिनींमध्ये तांत्रिक, व्यवस्थापकीय तसेच वर्तणूकविषयक कौशल्यांचे संवर्धन आणि विकास करण्यावर आहे. जेणेकरून या विद्यार्थिनी त्यांच्या करीयरच्या दृष्टीने सुधारणा करू शकतील.
‘ईटऑन’ची पद्धत सुरचित आहे. त्यांचे काही कार्यक्रम हे सर्व वयोगटातील महिला, सामाजिक आणि शैक्षणिक स्तरांच्या महिलांकरिता आहेत. त्यांच्या आय-टीच प्रोग्राम अंतर्गत ही कंपनी महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना साह्य करते. या अंतर्गत संपूर्ण भारतात अभियांत्रिकी पदवीचे तसेच पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या महिला प्रतिभावंतांकरिता ‘प्रतिभा’ हा शैक्षणिक शिष्यवृत्ती कार्यक्रम चालविण्यात येतो. या शिष्यवृत्ती कार्यक्रमामार्फत भारताच्या अग्रगण्य अभियांत्रिकी संस्थांमधील अद्वितीय विद्यार्थिनींचा शोध घेतला जातो. त्यांना शैक्षणिक शिखरे गाठण्यास मदत करते, शिवाय अभ्यासेतर कामगिरीतही साह्य केले जाते.
अशा पद्धतीचा आणखी एक कार्यक्रम तरुण महिलांकरिता कंपनीमार्फत चालविण्यात येतो. ज्याचे नाव उदयन शालिनी फेलोशिप असे आहे. समाजातील दुर्बल घटकांतील पात्र आणि प्रतिभावंत मुलींच्या व्यक्तिमत्व विकासाला मार्गदर्शकांचे पाठबळ लाभते. एकंदर या संघटनेने महाराष्ट्रातील 1400 हून अधिक महिला अभियंत्यांना साह्य उपलब्ध करून दिले आहे.
एशिया पॅसिफिक, ईटऑन, मॅनेजर इन्क्लुजन अँड डायव्हरसिटी, स्वाती वर्मा म्हणाल्या की, “आम्ही या क्षेत्रात सर्वसमावेशी आणि वैविध्यरुपी नमुना म्हणून स्वत:ला सादर करण्याची आकांक्षा बाळगतो. आमचा भर हा केवळ महिला कर्मचाऱ्यांना आरोग्यपूर्ण कार्य वातावरण उपलब्ध करून देण्याचे नसून त्यांच्यासाठी सुरक्षित, गुंतवून ठेवणारे आणि समृद्ध कार्य वातावरण निर्माण करण्याचे आहे. ज्यामुळे त्यांना शिकून स्वत:ची प्रगती साधून उन्नतीची संधी मिळेल. इथे सर्वांसाठी समावेश, प्रवेश आणि संधींची खातरजमा करण्यात आली आहे. आमचे कार्यक्रम तसेच उपक्रम हे विज्ञानाच्या क्षेत्रात लिंग समतोलाला प्रोत्साहन देणारे तसेच सर्वसमावेशक पद्धत अवलंबणारे आहेत.”
कार्यालयीन ठिकाण महिलांच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण आणि खऱ्या अर्थाने सर्वसमावेशी असावे. त्यांना विकास आणि प्रगतीच्या समसमान संधी उपलब्ध होतील याची खात्री देण्यासाठी ईटऑन कटिबद्ध आहे. दरवर्षी ईटऑन’च्या वतीने कॅम्पसमधून 45% हून अधिक महिला व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. ईटऑन’च्या रि-लॉन्च प्रोग्राम अनेक महिला व्यावसायिकांना साह्यकारी ठरला असून त्यांना करीयर ब्रेकनंतर स्वत:च्या करीयरचे पुनरुज्जीवन करणे शक्य झाले आहे. हा रि-लॉन्च प्रोग्राम क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धत मानण्यात येत असून अन्य साथीदार अशा पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत.