अर्थ-उद्योग

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व कृषी संकट संपविण्यासाठी १० सूत्री कार्यक्रम : किशोर तिवारी

मुंबई : स्व. वसंतराव नाईक शेती स्वालबन मिशन यांनी महाराष्ट्र सरकारला विदर्भ व मराठवाडा कृषी संपविण्यासाठी १० कलमी एकात्मिक कार्क्रम सादर केला असुन कोरडवाहू क्षेत्राच्या आत्महत्या संपविण्यासाठी तसेच ग्रामीण आर्थिक संकट संपविण्यासाठी महाविकास आघाडीचा हा कार्यक्रम देशात स्वीकारला जाईल असा दावा मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना १० सूत्री सादर केल्यावर केला .

सध्या विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र खानदेश गंभीर कृषी संकटात असून तेथे १९९८ पासून शेतकरी हजारोच्या संख्येत आत्महत्या करीत आहेत. सर्व मदत पॅकेजेस आणि कर्जमाफीचा हा प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले असताना संकटाचे मूळ प्रश्न चुकीचे धोरण असल्याचे किशोर तिवारी यांनी नवनियुक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना भेट घेऊन पुराव्यासह सादर केले . मुख्य सचिव कुंटे यांनी गंभीर दखल घेत हा १० सूत्री कार्यक्रम कृषी विभागाकडे पाठविली आहे व अंमलबजावणीसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत

किशोर तिवारी यांनी सादर केलेल्या शेती व ग्रामीण संकटावर मात करण्यासाठी दिलेल्या १० सूत्रीमध्ये राज्य आणि देशातील जागतिक बाजारपेठेच्या मागणीनुसार पीक पध्दतीकडे लक्ष वेधणे ,कर्जमाफी न करता सुधारित पत पुरवडा धोरण . जीवननिर्वाह करण्यासाठी जोडधंदा व्यवस्थापन, उत्पन्नाची वाढीसाठी शाश्वत प्रयोग , सिंचन, जलसंधारण, मातीचे आरोग्य पुनरुज्जीवन, प्रभावी पीक विमा आणि योग्य वातावरणातील बदल या विषयासह योग्य जोखीम व्यवस्थापन, जागतिक मागणीला धरून कापुस व इतर शेतीमालासाठी योग्य प्रोत्साहन, कडधान्ये व तेलबिया पिकांचे प्रोत्साहन, व्यावसायिक गुणवत्ता आरोग्य आणि शिक्षण ग्रामीण पायाभूत सुविधा, अन्न सुरक्षा आणि स्थानिक प्रशासनाच्या गुणवत्तेत सुधारणा यामध्ये समावेश आहे
शेतकरी आत्महत्या कृषी संकट या प्रलंबित प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा पूर्वीचा प्रयत्न मदत पॅकेजेस कर्जमाफीच्या अनुदान भरपाईच्या स्वरूपात पाच लाख कोटी रुपये खर्च कृषी संकट निराकरण झाले नाही तर मुक्त अर्थव्यवस्था, चुकीचा दिशाहीन हस्तक्षेप यामुळे निराकरण करण्याच्या दिशेने दुर्लक्ष करण्याच्या कारणामुळे १० मुद्द्यांच्या सुत्रीकडे केंद्र सरकारला सुद्धा राज्य सरकार मदत मंगनार आहे , किशोर तिवारी यांनी यावेळी महिती दिली .

किशोर तिवारी यांनी महाराष्ट्र राज्य सरकारला आग्रह धरला आहे कि वसंतराव नाईक मिशन देशातील एकमेव संस्था आहे जी ग्रामीण आणि कृषी संकटाच्या सर्व प्रश्नांकडे लक्ष देत आहे कारण ती केंद्र व राज्य सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना आणि कार्यक्रमांचे निरीक्षण करीत असते . कृषी, फलोत्पादन, कृषी वनीकरण, आदिवासी, समाज कल्याण आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणी, महिला सबलीकरण, ग्रामीण प्रशासन यावर चोख कामामुळे मिशनला कोणताही निधी खर्च न करता भूजल पातळीचे सध्याचे प्रश्न, राजकीय हस्तक्षेप आणि वृत्ती, योग्यता, स्थानिक नेतृत्त्वाची अडचण, या समस्येवर सरकारचे लक्ष वेधण्यात व कार्यक्रमाच्या अंबलबजावणी सुद्धा सुधारली आहे . आता ग्रामीण जीवनशैली आणि विषारी अन्न आणि पिण्यायोग्य पाण्यासह भू पाण्याची स्थिती सर्वात वाईट बनवित आहे म्हणूनच विदर्भ आणि मराठवाडा कृषी व ग्रामीण संकट मत करण्यासाठी सर्व मुख्य समस्या सोडविण्यासाठी मिशनने विस्तृत योजना तयार केली आहे आहे. महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यांच्या काळीमा फासणारा कलंक फुसण्यासाठी सरकारने १० सुत्रीवर भ्र्रष्टाचार मुक्त वातावरणात सहकार्य करण्याची मागणी सुद्धा किशोर तिवारी यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button