‘ एन आर आय संजीव भाऊ ‘सीडीक्यू तुझा’च्या ‘तोंडी परीक्षा’ कार्यक्रमात मी आपलं हार्दिक स्वागत करतो आणि संत मेवालाल यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर जमलेल्या पत्रकारांना टांग मारून आपण थेट आमच्या वाहिनीवर आल्याबद्दल मी आपले आभार सुद्धा मानतो.’
‘ते असू द्या. आधी मला सांगा की, माझ्या नावाआधी हे ‘एन आर आय’ काय लावलंय ? मी काही दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलेलं नाही. आणि जे काही विचारायचं आहे ते लवकर विचारा माझ्या घरात वृद्ध आईवडील आहेत, बायको आहे, मुलं आहेत. माझ्या बायकोला रक्तदाबाचा त्रास आहे. मला लवकर घरी जायला हवं. मी कुटुंबवत्सल माणूस आहे.’
‘ नाही.नाही. ते तुम्ही समजता तसं नाही आहे. ते एन आर आय म्हणजे ‘नॉट रीचेबल इंडियन’ आहे. तर ते असो. महत्वाचं म्हणजे आम्ही आपल्याला आमच्या ‘तुझा कट्टा’ या तोंडपूजेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या कार्यक्रमातच बोलावणार होतो, पण नुकताच आपल्या नावाला ‘बट्टा’ लागल्यामुळे आपल्याला ‘तुझा कट्टा’वर बोलवायचं तरी कसं आणि तोंडपूजेपणा तरी कुठल्या तोंडाने करायचा ? म्हणून मग आपल्याला ‘तोंडी परीक्षे’साठीच बोलवलं. करूयात सुरुवात ?’
‘ करा. करा. आणि जे काही विचारायचं आहे ते लवकर विचारा माझ्या घरात वृद्ध आईवडील आहेत, बायको आहे, मुलं आहेत. माझ्या बायकोला रक्तदाबाचा त्रास आहे. मला लवकर घरी जायला हवं. मी कुटुंबवत्सल माणूस आहे.’
‘अच्छा, सर्वात आधी सांगा की, पंधरा दिवस कुठे होतात आपण ?’
‘ कुठे पंधरा दिवस ? मी मोजून दहा दिवस लोकांसमोर नव्हतो. माझ्या घरात वृद्ध आईवडील आहेत, बायको आहे, मुलं आहेत. माझ्या बायकोला रक्तदाबाचा त्रास आहे. मी घरातच माझ्या कुटुंबाची काळजी घेत होतो.’222
‘ हो पण तुमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्याने एकदम दहा दिवस घरातच बसून राहणं म्हणजे – – -‘
‘ अहो, आमच्या सीएम साहेबांनीच जाहीर केलं होतं ना ‘ माझं कुटुंब माझी जबाबदारी’. त्यांचं ऐकायला नको ?
आणि जे काही विचारायचं आहे ते लवकर विचारा माझ्या घरात वृद्ध आईवडील आहेत, बायको आहे, मुलं आहेत. माझ्या बायकोला रक्तदाबाचा त्रास आहे. मला लवकर घरी जायला हवं. मी कुटुंबवत्सल माणूस आहे.’
‘ हो. हो. लवकरच आटोपून या आपण. मला सांगा राजकारणात राहूनही आपण इतके भावना प्रधान कसे आहेत ?’
‘ कसे म्हणजे ? काळीज वाघाचं असलं तरी मन मन माणसाचं आहे आमचं.आणि जे काही विचारायचं आहे ते लवकर विचारा माझ्या घरात वृद्ध आईवडील आहेत, बायको आहे, मुलं आहेत. माझ्या बायकोला रक्तदाबाचा त्रास आहे. मला लवकर घरी जायला हवं. मी कुटुंबवत्सल माणूस आहे.’
‘ अच्छा, वाघाचं काळीज म्हणजे मग कधीतरी झडप घालून मांसाचा आस्वादसुद्धा घेतलाच असेल ?’
‘अहो, वाघ कधी गवत खातो का ? तो तर कोवळं हरीणचं शोधणार ना ? थोडं समजून घेत चला.आणि जे काही विचारायचं आहे ते लवकर विचारा माझ्या घरात वृद्ध आईवडील आहेत, बायको आहे, मुलं आहेत. माझ्या बायकोला रक्तदाबाचा त्रास आहे. मला लवकर घरी जायला हवं. मी कुटुंबवत्सल माणूस आहे.’
‘अच्छा, पण घरात इतक्या अडचणी असतांना, आपल्या कुटुंबाला आपली गरज असतांना आपण इतक्या लवकर घरातून बाहेर कसे पडलात ?’
‘ अहो, तो कोण दीडशहाणा पोकळीभरे की कोण आहे त्याने सीएम साहेबांना पत्र लिहिलं म्हणे की , तुमचे मंत्री घडीघडी गायब होत असतील तर मला ‘लिव रिजर्व मंत्री’ नेमा म्हणून !’
‘मग ?’
‘ मग काय, सीएम साहेबांनी त्या पत्राची खरी नक्कलच मला पाठवली आणि सोबत त्यांची चिठ्ठी होतो की, तुम्ही जर बाहेरच्या पोकळ्या भरण्यातच इंटरेस्टेड असाल तर मी या पोकळीभरेची नेमणूक करून तुमची पोकळी भरून टाकू का ?’35
‘आपण इथे आलात त्यासाठी धन्यवाद. आमच्यातर्फे ही छोटीशी भेट.’
संजीव भाऊंंना एक छोटासा गिफ्टपॅक दिला जातो.
‘ काय आहे यात ?’
‘ आपल्या बदलणाऱ्या ‘मूड्स’साठी संरक्षक कवच !