आरोग्य

बाबा रामदेव यांच्या अटकेची मागणी; जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेची ही माहिती पतंजलीनं औषध लॉन्च केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आली आहे. यात असं दिसून आलंय की जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्टिफिकेशन स्कीमअंतर्गत आयुष मंत्रालयाचे सर्टिफिकेट मिळाले आहे.

कोरोना व्हायरसशी लढणारं औषध शोधण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयोग सुरू असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ समूहाने कोविड-19 आजारावर ‘कोरोनिल’ या आयुर्वेदिक औषधाची घोषणा केली होती. अश्वगंधा, गुळवेल, श्वासारी, तुळशी अशा वनौषधींपासून तयार करण्यात आलेलं औषध कोरोनारुग्णांना ठणठणीत बरं करू शकतं, त्याची यशस्वी चाचणीही आपण घेतलीय, असा बाबा रामदेव यांचा दावा होता. लाँचिंगपासूनच ‘कोरोनिल’ वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. यानंतर आता पुन्हा एकदा पतंजलीचं टेन्शन वाढलं असून Twitter वर बाबा रामदेव यांच्या अटकेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या उपचारांसाठी कोणत्याही पारंपारिक उपचारांना परवानगी दिलेली नाही तसंच अशा उपचारांचा दावा करत असलेल्या कोणत्याही संस्थेला सर्टिफिकेट्ही दिलेलं नसल्याचं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेची ही माहिती पतंजलीनं औषध लॉन्च केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आली आहे. यात असं दिसून आलंय की जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्टिफिकेशन स्कीमअंतर्गत आयुष मंत्रालयाचे सर्टिफिकेट मिळाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व एशियाच्या रीजनल अधिकाऱ्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की, कोरोनाच्या औषधाचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सर्टिफिकेशन करण्यात आलेलं नाही.

रामदेव बाबा यांनी अशी घोषणा केली होती की पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोविडवर उपचार होतील. आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली. यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या या ट्विटच्या आधारे बाबा रामदेव यांनी फसवणूक केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. माजी आयएएस सूर्य प्रताप सिंह यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

सूर्य प्रताप सिंह यांनी “बाबा रामदेव यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या नावे खोट्या गोष्टी पसरवण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी दिल्ली पोलीस तुम्ही अटक करणार का?” असा सवाल विचारला आहे. तसेच याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी असं देखील म्हटलं आहे.

रामदेव बाबांनी याआधीही कोरोनाचे उपचार शोधण्याचा दावा केला होता. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते म्हणून बुस्टर असं या औषधाला म्हटलं होतं आता रामदेव बाबांनी कोरोनिलला CoPP – WHO GMP च्या प्रोटोकॉल आणि सर्टिफिकेशन सिस्टमनुसार सहाय्यक औषध घोषित केले आहे. पतंजलीकडून असा दावा केला जात आहे की 70 टक्के रुग्ण तीन दिवसात या औषधाच्या वापरामुळे बरे होतील. मात्र कोरोनिल हे वादाच्या भोवऱ्यात सापडलं असून बाबा रामदेव यांच्या अडचणीत यामुळे वाढ होऊ शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनिलच्या विक्रीतून पतंजलीने बक्कळ कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. रामदेव बाबा यांच्या पतंजलीने फक्त चार महिन्यांच्या कालावधीमध्ये 85 लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले आहेत. चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपनीने कोरोनिल विकून 241 कोटी कमावले आहेत.23 जून ते 18 ऑक्टोबरदरम्यान एकूण 23 लाख 54 हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याची माहिती कंपनीच्या अधिकृत आकडेवारीत देण्यात आली आहे. कोरोनिल औषधाची किंमत 545 रुपये ठेवण्यात आली होती. 23 जूनला रामदेव बाबांनी आचार्य बाळकृष्ण यांच्यासह पत्रकार परिषद घेत कोरोनिल औषध लॉन्च केलं होतं. त्यानंतर अनेकांनी त्याचा वापर केला. ऑनलाईन माध्यमातूनही हे औषध मागवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. ऑर्डर केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये हे औषध घरपोच दिले जाईल असा दावा कंपनीने केला होता. कोरोनिल औषधामुळे कोरोना आठवड्याभरात बरा होत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र यामुळे मोठा वाद निर्माण झाला. औषधाच्या चाचण्या, ते तयार करण्यासाठी आवश्यक असलेले परवाने यावरून रामदेव बाबा आणि पतंजली वादात सापडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button