राजकारण

पंकजा मुंडेंचा बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार

मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मोठी घोषणा

मुंबई : बीड जिल्हा बँकेची निवडणुकीचे मतदान प्रक्रिया काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यापूर्वीच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे आता उद्या म्हणजेच शनिवार २० मार्च २०२१ रोजी होणाऱ्या निवडणूकीमध्ये भाजप कुठेही दिसणार नाही. त्यांचे उमेदवारही या निवडणुकीला हजर राहणार नाही आहेत. बीड जिल्हा बँकेची सत्ता भाजपच्या हाती आहे. परंतु भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीव बहिष्कार टाकला आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे आणि इतर लोकांनी सहकार मंत्र्यांवर दबाव आणला असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही उमेदवार बीड जिल्हा बँक चालवण्यासाठी पात्र नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी निवडणुक प्रक्रियेवर निषेध केला आहे आणि बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असून आम्हाला माणणारा मतदार वर्ग या निवडणूकीकडे फिरकणार नाही असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, बीड जिल्हा निवडणूक प्रक्रियेवर निषेध केला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे. त्यामुळे आम्हाला माणणारा मतदार वर्ग या निवडणूकीकडे फिरकणार नाही. या निवडणूकीत जिंकूण येण्याची जी आमची क्षमता आहे ती पुढेही काय राहणार आहे. निवडणूक झाली तर ती पूर्ण न्यायप्रक्रियेने झाली पाहिजे, या निवडणूकीत लोकशाही पद्धतीने निर्णय झाला पाहिजे अशी अपेक्षा असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकींबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकांमध्ये आमच्या सर्वांचे फॉर्म अपात्र ठरवल्या गेल्याने अन्याय झाला आहे. निवडणूक लढण्यापासून रोखूण प्रशासक आणण्याचे कारस्थान पालकमंत्री आणि सत्ताधाऱ्यांकडून सुरु असल्याची तक्रार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यपालांकडे केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button