Uncategorized

उन्नाव प्रकरणात एकतर्फी प्रेमातून हत्या

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यामध्ये शेतात दोन मुलींचे मृतदेह हे संशयास्पद अवस्थेत आढळले असून तिसऱ्या मुलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता उन्नाव प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला असून पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली आहे. काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींना स्नॅक्स खाऊ घातल्यानंतर त्यांना कीटकनाशक पाण्यात मिसळून पाजल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

उन्नाव प्रकरणातील एका मुलीवर कानपूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असून ती उपचाराला योग्य प्रतिसाद देत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तिला हळूहळू व्हेंटिलेटरवरून काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तसेच ती लवकरात लवकर ठीक होईल अशी आशा असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. आयजी लक्ष्मी सिंह यांनी याबाबत खुलासा करताना घटनेच्या दिवशी दोघेजण शेतातून पळताना दिसले होती. अशी माहिती शनिवारी सकाळी पोलिसांना गावातील एका प्रत्यक्षदर्शीकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी दोन्ही आरोपींना पाटकपुरा चौकातून ताब्यात घेतलं असल्याचं म्हटलं आहे.
आरोपी विनयची शेती पीडित मुलींच्या वडिलांच्या शेतीला लागूनच आहे. आरोपी विनय दररोज शेतात काम करण्यासाठी येथे येत असायचा. लॉकडाऊनच्या काळात विनयची या मुलींशी ओळख झाली होती. काही दिवसांपूर्वी विनयची एका मुलीशी मैत्री झाली होती. विनय या पीडित अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. पण मुलीने आरोपीला होकार दिला नव्हता. त्यामुळे आरोपीने या मुलींना शेतावर बोलावून त्यांना स्नॅक्स खायला दिले. त्यानंतर त्यांच्याशी बराच वेळ बोलत बसला. याचवेळी आरोपी विनयने शेतातील कीटकनाशक पाण्याच्या बाटलीत मिसळलं. त्यातील एका अल्पवयीन मुलीला याच बाटलीतील पाणी पाजायचं होतं.

संबंधित मुलीसोबत आलेल्या दुसऱ्या दोन मुलींनी आरोपीकडे पाण्याची मागणी केली. पण आरोपी विनयने कीटकनाशक मिश्रीत पाणी देण्यास नकार दिला. पण पीडित मुलींनी ती पाण्याची बाटली हिसकावून घेतली आणि कीटकनाशक मिश्रीत पाणी प्यायली. यानंतर या मुली बेशुद्ध झाल्या. पोलिसांनी शेतातून पाण्याची बाटली, स्नॅक्सची पाकिटं, सिगारेटचे खोके आणि पान मसालाचे काही पाऊच जप्त केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याप्रकरणीतील एक मुलगी जिवंत असून तिच्यावर उत्तम उपचार करून तिला वाचवण्याची मागणी होऊ लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button