कोरोनाचा धोका वाढला ! राज्यात ६२१८ नवे रुग्ण

मुंबई – देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,10,16,434 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,584 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,56,463 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान सातत्याने चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 21 लाखांवर गेली असून आतापर्यंत 51 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
राज्यात मंगळवारी (23 फेब्रुवारी) कोरोनाचे 6218 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 21,12,312 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 51,857 वर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल 20 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 20,05,851 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.