Top Newsराजकारण

अनिल देशमुख यांच्याविरोधात एनआयएचे कटकारस्थान, परमबीर सिंगांना वाचविण्याचा प्रयत्न : मलिक

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आले. परमबीरसिंग यांना वाचवण्यासाठी एनआयएने त्यांना आश्वासित केले. त्यामुळेच एनआयएच्या चार्जशीटमध्ये परमबीरसिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर भाजपच्या माध्यमातून खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान झाले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

एनआयएने जी चार्जशीट दाखल केली आहे, त्यामध्ये सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी परमबीर सिंग यांनी पैसे दिले होते. त्यांनी ५ लाख रुपये दिले होते, अशी माहिती सायबर एक्स्पर्टने दिली आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

पुढे बोलताना, एनआयएने जी चार्जशीट दाखल केली आहे त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांची चौकशी झाली नाही. त्यांना आरोपी करण्यात आले नाही. एक्स्टॉरशनसाठी हे सगळं कटकारस्थान सचिन वाझे यांनी केले आहे. त्यात पूर्ण सत्य आहे असं आमचं मत नाही. बरचसं काही यातून बाहेर येऊ शकत होतं. परंतु एनआयएने तसा काही तपास केला नाही. काही लोकांना वाचवण्यासाठी काम केले आहे. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने त्यांना जीवदान देण्यात आलंय, असा गंभीर आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button