जगभरात फेसबुक, व्हॉटस्अॅप आणि इंस्टाग्राम डाऊन
WhatsApp, Facebook and Instagram are down

मुंबई : शुक्रवारी रात्री अचानक मोबाईलवरचं व्हॉटस्अॅप बंद झालेलं लक्षात आलं असेल. सुरुवातीला इंटरनेट बंद झालं असं वाटत असेल. पण प्रत्यक्षात फक्त तुमच्याच फोनला नाही, तर जगभरात अनेकांना हा अनुभव आला. शुक्रवारी रात्री 11 नंतर जगभरात अनेक ठिकाणी whatsapp, facbook, instagram या सेवा ठप्प झाल्या. या तीनही सेवा सध्या फेसबुक ही एकच कंपनी देत आहे. नेमका काय तांत्रिक समस्या निर्माण झाली हे लक्षात आलेलं नाही.
जगभरात अनेकांनी हा इश्यू असल्याचं लक्षात येताच twitter च्या माध्यमातून मांडला. हा व्हायरसचा हल्ला आहे की काही तांत्रिक समस्या आहे, हे अद्याप लक्षात आलेलं नाही. फेसबुककडून अजूनही औपचारिकपणे काही प्रतिक्रिया आलेली नाही.
काही यूजर्सना व्हॉटस्अॅप वेबवर लॉग इन करण्यात ही अडचण येत होती. रात्री 10.40 वाजल्यापासून जगभरात व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज करण्यात अडचण येत होती. एक तासापेक्षा अधिक काळ तांत्रिक कारणांमुळे हे सगळे डाऊन होते. हे तीन प्लॅटफॉर्म कार्यरत नसतानाही लोक ट्विटरवर आले आणि सर्व बाजूंनी मीम्सचा पूर आला. यादरम्यान, लोकांचा स्वत: चा आनंद लुटला. तथापि, व्हॉटस्अॅपबरोबरच थोड्या वेळाने इतर दोन्ही प्लॅटफॉर्मही व्यवस्थित काम करू लागले.