शिक्षण

‘वी शिष्यवृत्ती’ने सांगलीतील १६ वर्षांच्या मुलीच्या कोडिंग शिकण्याच्या स्वप्नाला बळ पुरवले!

मुंबई : तबस्सुम गैबीसाहेब मणेर ही महाराष्ट्रातील सांगलीमधील १६ वर्षांची, अतिशय हुशार विद्यार्थिनी. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालयात शिकणाऱ्या तबस्सुमला रोज शाळेत चालत जावे लागत होते. तिचे वडील वाहनचालक आहेत आणि कुटुंबाचा संपूर्ण आर्थिक भार त्यांच्या एकट्याच्या खांद्यांवर आहे. आई गृहिणी आहे, तसेच तबस्सुमला अजून एक बहीण देखील आहे. ८००० रुपये महिना उत्पन्न असलेल्या वडिलांना चार जणांचे कुटुंब एकट्याने चालवणे दिवसेंदिवस कठीण बनू लागले होते. मूलभूत गरजा कशाबशा भागत होत्या इतकेच!

तबस्सुम तल्लख बुद्धीची आणि मोठी स्वप्ने पाहणारी मुलगी, तिला तंत्रज्ञानाविषयी भारी जिज्ञासा वाटत असे, खासकरून कोडिंगसारख्या तांत्रिक बाबी आपण शिकून घ्याव्यात अशी तीव्र इच्छा तिच्या मनात होती. पण स्रोतसाधने आणि आवश्यक गोष्टी उपलब्ध नसल्याने तिला पुढे काही करणे शक्य होत नव्हते.

गुरुशाळेकडून जेव्हा तिला वी शिष्यवृत्ती उपक्रमाबाबत समजले तेव्हा त्यामध्ये एक मोठी संधी असल्याचे तिने ओळखले आणि आपल्या महत्त्वाकांक्षांना मर्यादा घातल्या जाऊ नयेत यासाठी तिने त्याचा वापर केला. आपली गुणवत्ता आणि उत्कृष्ट कामगिरी यांच्या बळावर तिने शिष्यवृत्ती पटकावली. यामध्ये मिळालेल्या रकमेचा वापर करून तिने लॅपटॉप व पुस्तके विकत घेतली आहेत. आता यांचा उपयोग करून ती तिच्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करू शकते व आपले ज्ञानाचे क्षितिज अधिक व्यापक बनवू शकते.

या शिष्यवृत्तीमुळे तिला आपल्या स्वतःच्या क्षमता पारखण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. तबस्सुमला कोडिंग शिकायचे आहे आणि भविष्यात याच क्षेत्रात करिअर घडवायचे आहे. लॅपटॉपचा उपयोग आपली कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी आणि विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी करणार असल्याचे देखील तबस्सुम सांगते.

वोडाफोन आयडिया फाऊंडेशनने २०२१-२२ या वर्षासाठी ‘लर्निंग विथ वोडाफोन आयडिया स्कॉलरशिप’ कार्यक्रमांतर्गत शिक्षकांसाठी १ लाख रुपये व विद्यार्थ्यांसाठी २०,००० रुपयांच्या शिष्यवृत्ती प्रस्तुत केल्या आहेत. शिक्षण, ज्ञान, कौशल्ये यामध्ये अधिक चांगली कामगिरी करून दाखवण्यासाठी आवश्यक संसाधनांची उपलब्धता आणि पोहोच यांच्या संदर्भात शिक्षक व विद्यार्थ्यांना ज्या सामाजिक व आर्थिक भेदांचा सामना करावा लागतो ते भेद दूर करावेत हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या कार्यक्रमाबाबत वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ रेग्युलेटरी व कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर श्री. पी. बालाजी यांनी सांगितले, “तंत्रज्ञानातील नैपुण्ये व नेटवर्क यांचा उपयोग करून सामाजिक प्रभाव निर्माण करण्यासाठी वी वचनबद्ध आहे. रोजगारक्षमता वाढवून देशातील गरिबी दूर करण्यासाठी शिक्षणाची उपलब्धता वाढवणे हा मूलभूत उपाययोजनांपैकी एक उपाय आहे. आमचे असे ठाम मत आहे की, केवळ आर्थिक मर्यादांमुळे कोणाही विद्यार्थ्याला किंवा शिक्षकाला आपल्या संपूर्ण क्षमता आजमावण्यापासून रोखले जाऊ नये.”

महाराष्ट्रातील सांगली येथील सीमा शिवाजी खोत या ४० वर्षीय शिक्षिका नेर्ले येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये इयत्ता सहावी, आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गांना गणित व विज्ञान शिकवतात. त्या रोज शाळेत येण्याजाण्यासाठी स्कुटीवरून प्रवास करतात. गेली १३ वर्षे त्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून आजवर पारंपरिक पद्धतींचाच वापर करत आल्या आहेत. पण शिकवण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर केला जावा ही महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात सतत होती.

सीमा भाड्याच्या घरात राहतात, त्यांचे पती देखील शिक्षक आहेत आणि या दोघांचेही राहणीमान अतिशय साधे आहे. विद्यार्थ्यांना विषयांमध्ये जास्त रुची वाटावी यासाठी वेगवेगळे प्रयोग करणे, त्यांना अभ्यास प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणे त्यांना नक्कीच आवडेल. शिकवण्याच्या पारंपरिक पद्धती आणि संगणकासारख्या संसाधनांचा अभाव यामुळे त्यांना आपल्या योजना प्रत्यक्षात उतरवणे मात्र शक्य होत नव्हते.

वी शिष्यवृत्ती कार्यक्रमाबद्दल गुरुशाळेमार्फत समजल्यावर सीमा यांनी ओळखले की त्यांच्या योजना पूर्ण करण्याची ही संधी आहे. त्यांनी अर्ज केला व त्यांच्या आजवरच्या पात्रता, इतक्या वर्षांची शिकवण्यातील कामगिरी हे सर्व तपासून त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. या रोख पारितोषिकामधून सीमा यांनी लॅपटॉप, प्रिंटर, टॅब एम १० स्लेट व एक पेनड्राइव्ह विकत घेतला. त्यांनी शाळेसाठी एक साऊंड सिस्टिम, पोर्टेबल ऍम्प्लिफायर आणि कॉर्डलेस माईक देखील विकत घेतला. आपल्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे हा त्यांचा संकल्प किती दृढ आहे याची साक्ष यामधून पटते.

सीमा यांनी सांगितले की, तंत्रज्ञान आल्यामुळे त्यांची शिकवण्याची गुणवत्ता वाढली. प्रिंटरच्या साहाय्याने चित्रांच्या प्रिंट आऊट काढून त्या विद्यार्थ्यांना दाखवतात जेणेकरून विद्यार्थ्यांची विषयाची समज अधिक वाढते. आपल्या विद्यार्थ्यांना पुस्तकातील संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजाव्यात यासाठी एक मिनी लॅब तयार करण्याची देखील त्यांची योजना आहे.

वोडाफोन आयडिया फाऊंडेशनने २०२१-२२ या वर्षासाठी ‘लर्निंग विथ वोडाफोन आयडिया स्कॉलरशिप’ कार्यक्रमांतर्गत शिक्षकांसाठी १ लाख रुपये व विद्यार्थ्यांसाठी २०,००० रुपयांच्या शिष्यवृत्ती प्रस्तुत केल्या आहेत. शिक्षण, ज्ञान, कौशल्ये यामध्ये अधिक चांगली कामगिरी करून दाखवण्यासाठी आवश्यक संसाधनांची उपलब्धता आणि पोहोच यांच्या संदर्भात शिक्षक व विद्यार्थ्यांना ज्या सामाजिक व आर्थिक भेदांचा सामना करावा लागतो ते भेद दूर करावेत हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या कार्यक्रमाबाबत वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ रेग्युलेटरी व कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर श्री. पी. बालाजी यांनी सांगितले, “तंत्रज्ञानातील नैपुण्ये व नेटवर्क यांचा उपयोग करून सामाजिक प्रभाव निर्माण करण्यासाठी वी वचनबद्ध आहे. रोजगारक्षमता वाढवून देशातील गरिबी दूर करण्यासाठी शिक्षणाची उपलब्धता वाढवणे हा मूलभूत उपाययोजनांपैकी एक उपाय आहे. आमचे असे ठाम मत आहे की, केवळ आर्थिक मर्यादांमुळे कोणाही विद्यार्थ्याला किंवा शिक्षकाला आपल्या संपूर्ण क्षमता आजमावण्यापासून रोखले जाऊ नये.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button