शिक्षण

यूपीएससीची पूर्वपरीक्षा लांबणीवर; १० ऑक्टोबरला होणार परीक्षा

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगा (यूपीएससी) ची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर गेली आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर २७ जूनला होणारी पूर्वपरीक्षा आता १० ऑक्टोबरला होणार आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने अनेक परीक्षा या रद्द अथवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ आता यूपीएससीची पूर्वपरीक्षा देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा येत्या २७ जूनला होणार होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. १० ऑक्टोबरला आता ही परीक्षा होणार आहे. गेल्या वर्षी परीक्षा ३१ मे ते ४ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आली होती. आतापर्यंत मुख्य लेखी परीक्षा संपली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुलाखती रोखण्यात आल्या होत्या.

अन्य परीक्षाही लांबणीवर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसाठी अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या निवडीची ९ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लांबणीवर पडलेल्या परीक्षांच्या तारखा निशअचित झाल्यावर उमेदवारांना त्याबाबतची माहिती देण्यात येईल असं आयोगाने सांगितलं आहे. ५ मेपासून सुरू होणाऱ्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेची नोंदणीही आयोगाने पुढे ढकलली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button