राजकारण

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादीच्या दोन गटांत बाचाबाची

पालघर : पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात आज तुफान राडा झाला. आमदार सुनील भुसारा आणि निलेश सांबरे यांच्या गटात ही हाणामारी झाली. राष्ट्रवादीचे ६ तर काँग्रेसचे १ सदस्य गट स्थापनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी हा गदारोळ झाला. या दरम्यान आमदार सुनील भुसारा आणि माजी सभापती काशीनाथ चौधरी यांनी धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.

पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांची आणि उपाध्यशांची निवडणूक जवळ आली असल्याने जिल्हा परिषद गटस्थापनेसाठी निलेश सांबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे ६ सदस्य आणि काँग्रेसच्या १ सदस्यांच्या पाठिंबाने गट स्थापन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बसले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांच्या गटाचा याला विरोध होता. त्यामुळे जिल्हाधिकारींच्या दालनात निलेश सांबरे गट आणि सुनील भुसारा गटात मोठा वाद झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या मंदा घरट यांना दालनाबाहेर खेचून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.

राष्ट्रवादीचा जो गट स्थापन करण्यासाठी आला त्याला सुनील भुसारा यांनी विरोध दर्शवला आणि जिल्हाधिकारी यांच्या दालनातच तुफान गराडा घातला. यावेळी पालघरमधील राष्ट्रवादीचे प्रतिष्ठित सुहास संख्ये यांच्याशीही सुनील भुसारा यांनी शाब्दिक बाचाबाची केल्याचे दिसले. या प्रकारामुळे गट स्थापन करायला आलेल्या सदस्यांना धोका असल्याने त्यांनी पोलीस सुरक्षा मागविली. त्यानंतर सर्व सदस्यांना पोलीस मोठ्या बंदोबस्तात सुरक्षित ठिकाणे घेऊन गेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button