राजकारण

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची हॅटट्रिक; केरळमध्ये डाव्यांची सरशी; आसाम-पुदुचेरीत भाजप; तामिळनाडूत सत्तांतर

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तुणमूल काँग्रेसने हॅटट्रिक केली आहे. आसाममध्ये भाजपला सत्ता राखण्यात यश आलं आहे. केरळमध्ये एलडीएफने सत्ता राखली, तर तामिळनाडूत एआयडीएमकेची सत्ता उलटवली असून डीएमकेने मोठा विजय मिळवून सत्ता खेचून आणली. पुद्दुचेरीमध्ये भाजपप्रणित एनडीएने काँग्रेसला धोबीपछाड दिली.

देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विजयाची हॅटट्रिक नोंदवली. मात्र २९२ विधानसभा सदस्य असलेल्या या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाच नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर निसटता विजय मिळवला.

दरम्यान, संध्या. ६.३० वाजेपर्यंतच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये २९२ पैकी तृणमूलला २१६, भाजप ७३, काँग्रेस ० आणि अन्य ०३ जागांवर आघाडीवर होते. बंगालमध्ये बहुमतासाठी १४७ जागांची गरज आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने २०० पेक्षा जास्त जागा मिळवून एकहाती सत्ता स्थापन खेचून आणली आहे.

आसाममध्ये भाजपने गड राखला

आसाम विधानसभेच्या १२६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. आसाममध्ये भाजपला ७९, काँग्रेसला ४६ आणि अन्य १ अशा जागांवर आघाडी मिळाली.

तामिळनाडूमध्ये सत्तांतर

तामिळनाडू विधानसभेत मोठा उलटफेर झाला आहे. सत्ताधारी AIDMK ला मोठा झटका बसला आहे. DMK ने एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल केली आहे. तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांसाठी निवडणूक झाली. DMK ने यापैकी १५५ जागांवर आघाडी मिळवली तर सत्ताधारी AIDMK ला ७८ जागांवर आघाडी घेता आली. अन्य १ असं चित्र तामिळनाडूत पाहायला मिळालं.

केरळमध्ये डाव्यांनी गड राखला

केरळमध्ये सत्ताधारी LDF ने पुन्हा डाव मांडला आहे. एक्झिटपोलमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या LDF ने प्रत्यक्ष मतमोजणीतही आपला दबदबा कायम राखला. १४० जागांच्या केरळ विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी LDF ने ८७, काँग्रेसने ४६, भाजप ६ आणि अपक्ष-इतर ०१ असं चित्र पाहायला मिळालं.

पुद्दुचेरीत काँग्रेसला धक्का

पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसला झटका बसला आहे. ३० सदस्य संख्या असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत भाजपप्रणित एनडीएने सत्ता स्थापनेच्या दृष्टीने पावलं टाकली. पुद्दुचेरीमध्ये NDA ला १५, काँग्रेसला १०, इतर ५

(वरील आकडे हे संध्याकाळी ७ पर्यंतच्या कलानुसार आहेत. या आकड्यांमध्ये बदल होऊ शकतात)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button