फोकस

नाशिकमधील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

नाशिक : नाशिक शहर पोलीस दलातील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, १० सहायक पोलीस निरीक्षकांचीही बदली झाली आहे. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांची महाराष्ट्र पोलिस अकादमीत झाली आहे. तर म्हसरुळ पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांची नाशिक ग्रामीण पोलीस दलात बदली झाली आहे. राज्यातील सर्वसाधारण बदल्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील व शहरातील विविध पोलीस आस्थापनांमध्ये असलेल्या १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काहीजणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशकातील सर्वात जास्त पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पदस्थापना देण्यात आली आहे. राज्य पोलीस दलाच्या आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सारंगल यांनी या बदल्यांचे आदेश काढून पदस्थापना केल्या आहेत.

बदली झालेले पोलीस निरीक्षक (कंसात आधीचे व नियुक्तीचे ठिकाण)

अशोक भगत (नाशिक शहर ते महाराष्ट्र पोलिस अकादमी), पंढरीनाथ ढोकणे (नाशिक शहर ते नाशिक ग्रामीण), प्रिया थोरात (महाराष्ट्र पोलिस अकादमी ते मुंबई शहर), नंदकुमार गायकवाड (नाशिक ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), विश्वजित जाधव (नाशिक ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), सुहास देशमुख (नाशिक ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), अनिल लोखंडे (नाशिक ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), आनंद निकम (नाशिक ग्रामीण ते ठाणे शहर), संजय महाजन (नाशिक ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), सुनिल गोसावी (नाशिक ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), नम्रता देसाई (नाशिक शहर ते गुन्हे अन्वेशन विभाग), गुलाब जाधव (महाराष्ट्र पोलीस अकादमी ते नाशिक शहर), भरतसिंग पराडके (नाशिक शहर ते महाराष्ट्र पोलिस अकादमी), अनिल पवार (नाशिक शहर ते नाशिक ग्रामीण), दिनकर कदम (अजप्रतस नाशिक ते नाशिक शहर), सुरेखा पाटील (अहेर) (अजप्रतस नाशिक ते नाशिक शहर), स्वाती कुराडे (राज्य गुप्तवार्ता ते नाशिक शहर), इंद्रजित राऊळ (महाराष्ट्र पोलिस अकादमी ते नाशिक शहर).

नाशिकला आलेले नवीन पोलीस निरीक्षक

शिवराम गवळी (नंदूरबार ते नाशिक अजप्रतस), काशीनाथ जाधव (ठाणे ते नाशिक शहर), शिवाजी देशमुख (औरंगाबाद ते नाशिक ग्रामीण), यशवंत बाविस्कर (यवतमाळ ते नाशिक ग्रामीण), जयंत राऊत (बीडीडीएस अमरावती ते महा. पोलिस अकादमी), संजयकुमार गावित (विसुवि ते नाशिक शहर), संजय गायकवाड (पो. प्र. केंद्र, जालना ते नाशिक ग्रामीण), युवराज पत्की (नागपूर ते नाशिक शहर), ज्योती आमने (गुअवि ते नाशिक शहर), दिलीप ठाकूर (नागपूर ते नाशिक शहर), मुरलीधर कासार (चंद्रपूर ते अजप्रतमस, नाशिक). ज्योती करंदीकर(रागुवि ते अजप्रतमस, नाशिक).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button