शिक्षण

तेजस प्रकल्पामध्ये ५१,००० शिक्षकांना प्रशिक्षण

ब्रिटीश कौन्सिल, टाटा ट्रस्टस आणि महाराष्ट्र सरकार १४ लाख विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्यास सक्षम

मुंबई : टाटा‌ ट्रस्टस आणि महाराष्ट्र राज्य सरकारसोबतच्या भागीदारीमध्ये ब्रिटीश काउंसिलने सादर केलेल्या तेजस ह्या नावीन्यपूर्ण शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाची सफल पूर्तता झाली आहे. महाराष्ट्रभरामधील सरकारी शाळांमधील प्राथमिक शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ह्या कार्यक्रमामुळे लाभ झाला आहे व त्यांच्या इंग्लिश भाषेच्या प्रभूत्वामध्ये सुधारणा झाली आहे व प्रकल्पाने आपली उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. ह्या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमधील ५१,००० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले व त्यानंतर त्यांनी सरकारी शाळांमधील १४ लाख लहान विद्यार्थ्यांना शिकवले. हा प्रकल्प सहभागावर आधारित व अनुकरण करता येणा-या एका मॉडेलनुसार राबवण्यात आला ज्यामध्ये शिक्षकांना फक्त स्वत:चाच विकास घडवून आणता आला असे नाही, तर ते मोठ्या सहका-यांच्या गटासोबत आणि राज्याच्या पलीकडेही ती प्रक्रिया सुरू ठेवू शकले.

वर्च्युअल प्रकारे आयोजित पूर्तता समारंभाला महाराष्ट्र सरकारच्या माननीय शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री सौ. वर्षा गायकवाड, ब्रिटीश काउंसिल इंडियाच्या संचालिका बार्बरा विकहॅम ओबीई, ब्रिटीश काउंसिल, वेस्ट इंडियाचे संचालक डॉ. जॉवियन इलिक, टाटा ट्रस्टसच्या शिक्षण प्रमुख अमृता पटवर्धन, महाराष्ट्र एससीईआरटीचे संचालक दिनकर तेमकर आणि प्रादेशिक शिक्षण प्राधिकरण औरंगाबादचे संचालक डॉ. सुभाष कांबळे उपस्थित होते. ह्या कार्यक्रमामध्ये ह्या प्रकल्पाच्या सफलतेमध्ये योगदान दिलेल्या व विशेषत: गेल्या वर्षभरामध्ये कोव्हिड- १९ महामारीच्या उद्भवानंतरच्या परिस्थितीमध्ये योगदान दिलेल्या मुख्य भागधारक व सहभागी व्यक्तींना गौरवण्यात आले. त्यामध्ये ७७५ शिक्षक उपक्रम गट (टीएजी) समन्वयक आणि २४० केंद्र प्रमुख (केपीज) होते जे संबंधित टीएजीच्या समन्वयन व प्रशासनिक कार्यवाहीसाठी अनुक्रमे जवाबदार होते.

महाराष्ट्र राज्यासाठी तेजस हा एक लक्षणीय प्रकल्प आहे, कारण त्यामध्ये शिक्षक प्रशिक्षणाच्या पारंपारिक मॉडेलचे रुपांतर हे अधिक शाश्वत, अंतर्गत सहाय्य असलेल्या पद्धतीकडे केले जाते व त्यातून शिकवण्यात येणा-या समुदायांमधून एकात्मिक व्यावसायिक प्रगतीला चालना मिळते. ह्या प्रकल्पामुळे राज्याच्या संस्थात्मक क्षमतेची उभारणी करून सेवावरत शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या सहाय्यासाठी व व्यापक पातळीवरील व दीर्घ अवधीमधील अंमलबजावणीसाठी मदत मिळाली आहे व व्हर्च्युअल माध्यम वापरून आपल्या पहिल्या लॉकडाउननंतर गेल्या वर्षभरामध्ये ३,५०० पेक्षा जास्त ऑनलाईन बैठकांचे आयोजन केले.

तेजसच्या पूर्तता कार्यक्रमामध्ये बोलताना महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री सौ. वर्षा गायकवाड, म्हणाल्या की महाराष्ट्र सरकार, ब्रिटीश काउंसिल आणि टाटा ट्रस्टसच्या विशेष भागीदारीचा दृश्य परिणाम बघताना मला आनंद होत आहे व त्यामुळे आपल्या प्राथमिक शालेय शिक्षकांच्या कौशल्यांमध्ये वाढ झाली आहे व विद्यार्थ्यांसाठी अध्ययनामध्ये सुधारणा झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील अध्यापन व अध्ययनाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे.

ब्रिटीश काउंसिल इंडियाच्या संचालिका बार्बरा विकहॅम ओबीई म्हणाल्या की शिक्षकांना त्यांच्या इंग्लिश भाषेच्या अध्यापन कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी व राज्यातील सरकारी शाळांमधील १४ लाख विद्यार्थ्यांना अधिक चांगले अध्यापन देण्यासाठी सहाय्य करण्यात आले. हे स्वयंपूर्ण प्रकल्प मॉडेल भविष्यातही शिक्षकांसाठी विकासाच्या संधी देणे सुरू ठेवेल. महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्टससोबतच्या आमच्या अतिशय जुन्या भागीदारीसाठी ही बाब गौरवाही आहे व आमचा भर जागतिक संधींसाठी शिक्षक व विद्यार्थ्यांची अधिक सक्षम प्रकारे तयारी करणे, हा आहे. महाराष्ट्राच्या ज्ञान आकांक्षांसोबत भागीदारी करून आमच्या कार्यक्रमांद्वारे युवांसाठी अधिक संधींची निर्मिती करण्यासाठी आम्ही पुढेही कटिबद्ध राहू.

अमृता पटवर्धन म्हणाल्या की राज्य, स्वयंसेवी संस्था व तांत्रिक विशेषज्ञ समान उद्दिष्टासाठी एकत्र येऊन कशा प्रकारे शिक्षण सुधारणा शक्य आहेत, हे दर्शवणारे तेजस हे आदर्श मॉडेल ठरले आहे. ग्रामीण प्राथमिक शिक्षकांसाठी तेजसने सातत्यपूर्ण शिक्षक व्यावसायिक विकासाचा एक सक्षम प्रकार समोर ठेवला आहे व त्यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापराबरोबर समोरासमोरील संवादाच्या अध्ययनाच्या सामाजिक स्वरूपाला टिकवले गेले आहे. तेजसमधून मिळालेले धडे शिक्षकांच्या प्रभावी विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत व सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिअण देण्यामध्ये त्यांची भुमिका अतिशय महत्त्वाची आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button