राजकारण

महाविकास आघाडीचे तीन नेते सोमय्यांच्या रडारवर; डिसेंबरमध्ये घोटाळे बाहेर काढणार

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर आता आणखी तीन नेते आहेत. येत्या डिसेंबरमध्ये या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. या तीन नेत्यांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचा देखील समावेश आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री ॲड. अनिल परब आणि अर्जुन खोतकर यांच्यावर सोमय्या यांनी टीका केली. अर्जून खोतकर यांचा घोटाळा लवकरच बाहेर काढणार असं किरीट सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या यांनी खोतकर यांच्यावर जालना सहकारी कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. खोतकर यांनी मुळे कुटुंबीयांशी मिळून हा भ्रष्टाचार केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसंच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण दाबण्यात आल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केलं. दरम्यान अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणी ॲड. अनिल परब यांना हरित लवादाने जबाब नोंदवण्यास सांगिल्याची माहितीही सोमय्या यांनी दिली.

किरीट सोमय्या यांनी यावेळी शिवसेनेवर टीका केली. शनी मंदिराच्या पुजाऱ्यावर हल्ला झाला, या घटनेचा मी निषेध करतो. आज बाळासाहेब असते तर ते याविरोधात रस्त्यावर उतरले असते. मात्र आताच्या शिवसेनेने या घटनेचा साधा निषेध देखील केला नाही. त्यामुळे आता पूर्वीची शिवसेना राहिलेली नाही, अशी टीका सोमय्या यांनी शिवसेनेवर केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button