श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर अतिरेक्यांचा हल्ला; २ जवान शहीद
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेक्यांनी डोकं वर काढलं आहे. श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर अतिरेक्यांनी मोठा हल्ला केला आहे. हा हल्ला श्रीनगरच्या लवेपोरा येथे करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून दोन जवान जखमी झाले आहेत. या जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
लावापोरा येथे आज दुपारी अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर हल्ला केला. त्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर लवेपोरा येथे प्रचंड घबराट पसरली असून तणावाची परिस्थिती आहे. या हल्ल्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली असून अतिरेक्यांचा शोध घेत आहेत. या ठिकाणचे सर्व दुकाने, मार्केट बंद करण्यात आले आहे. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. हे अतिरेकी कोणत्या दहशतवादी संघटनेचे होते याची माहिती अद्याप मिळाली नसून सुरक्षा दलाचे जवान त्याचाही शोध घेत आहेत.