फोकस

चिथावणीखोर ‘हिंदुस्थानी भाऊ’ला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानाबाबत न्यायालयात बिनशर्त माफी मागण्यात आल्याचं वकील अ‍ॅड. महेश मुळ्येंनी सांगितलं. याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी हिंदुस्थानी भाऊला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दहावी आणि बारावीच्या ऑफलाइन परीक्षांच्या निर्णयाविरोधात मुंबईतील धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना घेराव घालत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याने या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे हे आंदोलन उभे राहिल्याचे समोर आल्यानंतर धारावी पोलीस ठाण्यात हिंदुस्थानी भाऊ आणि इकरार खान वखान खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात हिंदुस्थानी भाऊ आणि इकरार खानला अटक करण्यात आली. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला होता. विद्यार्थी आंदोलन करतायत ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असंही हिंदुस्थानी भाऊने एबीपी माझाशी बोलताना काल सांगितलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने म्हटलं होतं.

काय म्हणालेला विकास फाटक

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे सोशल मीडिया सेलिब्रिटी हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ असल्याचे बोललं जात आहे. चार दिवसांपूर्वी हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घ्याव्यात. शक्य झाले तर रद्द करा पण विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका. जर निर्णय बदलला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असे व्हिडीओत हिंदुस्थान भाऊने म्हटले होतं.

हिंदुस्तानी भाऊवर वेगवेगळ्या कलमांतर्गत धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊला धारावी पोलीस ठाण्यात आणलं. भल्या पहाटे त्याला नायर रुग्णालयातदेखील तपासणीसठी नेण्यात आलं होतं. त्यानंतर आता पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

हिंदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी मुलांना एकत्रित जमण्याचे आवाहन, ऑडिओ क्लिप व्हायरल

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊवर धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर हिदुस्थानी भाऊच्य सुटकेसाठी मुलांनी एकत्रित जमण्याचे आवाहन करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये मुलींनी जास्तीत जास्त प्रमाणात जमण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अमान नावाच्या मुलाच्या नावे ही क्लिप सध्या व्हायरल होतेय.

मी अमान बोलतोय ग्रुपचा अ‍ॅडमिन. मी वांद्र्यात आलोय. इथे मी चौकशी केली वकिलांकडे इथे भाऊ नाहीत. भाऊना निघून अर्धा ते पाऊण तास झालाय. आता भाऊ धारावीत पोलीस कोठडीत आहेत. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जास्तीत जास्त संख्येने धारावीत या. आम्ही पण धारावीत जात आहोत. सर्वात जास्त आम्हाला मुलींची गरज आहे. मुली जास्त असतील तर पोलीस मारणार नाहीत. तेथे मीडिया पण आहे. आपली मैत्रीण, आपल्या बहिणी सर्वांना घेऊन या. जास्तीत जास्त विद्यार्थांना घेऊन या. कृपया सपोर्ट करा. लवकरात लवकर पोहचा, असे आवाहन या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button