अर्थ-उद्योगस्पोर्ट्स

मोबाइल गेमिंगच्या क्षेत्रात बदल घडवत आहे ‘मोबा’ !

मुंबई : मोबा (MOBA) हा गेमर्ससाठीचा एक उत्तम गेमिंग अनुभव देणारा अत्यंत लोकप्रिय फॉरमॅट आहे. परंतु गेमिंगच्या क्षेत्रात नव्याने आलेल्यांसाठी मोबा हा मल्टीप्लेयर ऑनलाइन बॅटल अरेना ठरतो. क्लॅश ऑफ टायटन्स भारतात एमओबीए गेम्सची लोकप्रियता वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे, कारण मोबाइल साधनांसाठी विकसित केलेला तो पहिलावहिला भारतीय मल्टीप्लेयर ऑनलाइन बॅटल एरेना (मोबा) गेम आहे. सोपे स्वरूप, हिरो व्हॅरिएंट आणि व्यक्तिमत्वे, मोफत खेळण्याचा गेम आणि अत्यंत सोशल ही मोबा लोकप्रियतेमागील चार प्रमुख कारणे आहेत.

सोपे स्वरूप: क्लॅश ऑफ टायटन्ससारख्या मोबा गेम्सचे स्वरूप अत्यंत सुलभ आहे. यात दोन टीम्स एकमेकांशी त्यांच्या विरोधकांचा तळ उद्ध्वस्त करण्यासाठी स्पर्धा करतात. क्लॅश ऑफ टायटन्ससारख्या गेम्सची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की खेळाडूंना आपल्या मोबाइल/ हातातील साधनांवर फक्त दोन बोटांचा वापर करून आपली पात्रे नियंत्रित करायची आहेत आणि त्यांना लढण्यासाठी सहभागी करायचे आहे.

हिरो व्हॅरिएंट आणि व्यक्तिमत्वे: मोबा गेम्समधून विविध प्रकारचे हिरोज आणि त्यांचे पोशाख दिले जातात. तुमचे कौशल्य कितीही पातळीवरील असले तरी तुम्हाला काही अत्यंत खास व्यक्तिरेखा मिळतील, ज्या गेम अधिक रोमांचक आणि खेळण्यासाठी धमाल बनवतील. क्लॅश ऑफ टायटन्समध्ये ५६ टायटन्स आहेत. त्यातील प्रत्येकाकडे विशेष क्षमता आहेत आणि टँक्स, वॉरियर्स, असेसिन्स, मेग्स, मार्क्समेन अशा विविध वर्गवारींमध्ये त्यांचे वर्गीकरण केलेले आहे.

मोफत खेळण्याचा गेम: क्लॅश ऑफ टायटन्स हा एक मोफत खेळण्याचा गेम असून त्यात मोबा फॉरमॅटचा रोमांच आहे आणि गेमिंग फीशी संबंधित गेटकीपिंग नाही. मग तुम्ही रूकी असाल किंवा प्रो. तुम्ही एक पैसाही न देता तुमच्या मित्रांसोबत हा गेम कुठेही आणि कधीही खेळू शकता. दररोज लॉग इन करणाऱ्या गेमर्सना मोफत टायटन्स आणि आकर्षक रिवॉर्ड्स दिले जातील.

अत्यंत सोशल: मोबा गेम्स खेळाडूंना एकमेकांशी सोशलाइज करून आपल्या विशिष्ट टायटनची कौशल्ये आणि गुणधर्म वापरण्यासाठी तसेच शत्रूचा पाया नष्ट करण्यासाठी प्रेरित करतात. क्लॅश ऑफ टायटन्समध्ये खेळाडू आपल्या मित्रांनाही सहभागी होण्यासाठी आणि स्क्वाड तयार करण्यासाठी आमंत्रित करू शकतात. त्यामुळे त्यांना हा अत्यंत आकर्षक गेम प्ले अनुभव एकत्रित घेता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button