
पुणे : भाजप नेते आणि माजी खा. किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात शिवसैनिकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. सोमय्या आज पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाणार होते. मात्र त्यापूर्वीच पुणे महापालिका परिसरात शिवसैनिकांकडून सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या गोंधळात किरीट सोमय्या हे पायऱ्यांवर पडल्याचंही पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता असा गंभीर आरोप केला आहे. महापालिकेची सुरक्षा कुठे होती? पोलीस कुठे होते? असा सवालही पाटील यांनी यावेळी विचारलाय.
महापालिकेच्या आवारात आयुक्तांना भेटायला आलेल्या सोमय्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. एकजण दगड घेऊन धावत होता. सोमय्यांना मारण्याची पूर्ण योजना झाली होती. सत्य लपणार नाही. सोमय्या यांच्या हाताला दुखापत झालीय. त्यांच्या कंबरेला मार लागला आहे. आज त्यांना ठार मारण्याचाच हेतू होता. महापालिकेची सुरक्षा कुठे होती? पोलीस कुठे होते? केंद्र सरकारची सुरक्षा नसती तर आज सोमय्यांना श्रद्धांजली वाहावी लागली असती, असा हल्लाबोल पाटील यांनी केलाय.
लोकशाहीचा मुडदा पाडू नका; फडणवीसांचा घणाघात
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फोन करुन फडणवीसांनी घडलेल्या प्रकाराची आणि सोमय्या यांच्या प्रकृतीबाबत विचारपूसही केलीय. राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!, असं ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकर आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय.
हल्ले करुन सत्य लपणार नाही : आशिष शेलार
भ्रष्टाचाराची घबाडं ज्यांची उघड झाली त्यांना आता तोंड लपवण्यासाठी जागा न उरल्यामुळे हल्ले करु लागले आहेत.
पण सत्य हल्ले करुन, दमदाटी, मारामारी करुन लपणार नाही… सत्य समोर येणारच!
किरीट सोमय्या यांच्या सोबत आम्ही सगळे आहोत!
https://t.co/9ivE2vrFX9— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 5, 2022
किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर आता भाजप नेतेही आक्रमक बनले आहेत. ‘भ्रष्टाचाराची घबाडं ज्यांची उघड झाली त्यांना आता तोंड लपवण्यासाठी जागा न उरल्यामुळे हल्ले करु लागले आहेत. पण सत्य हल्ले करुन, दमदाटी, मारामारी करुन लपणार नाही. सत्य समोर येणारच! किरीट सोमय्या यांच्यासोबत आम्ही सगळे आहोत’, असं ट्विट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलंय.
आरोपांना उत्तर द्या, प्रसाद लाड यांचं आव्हान
कर नाही, त्याला डर कशाचा!
मा. @KiritSomaiya यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे सरकार असल्याचा दुरुपयोग असून, सत्ताधारी कार्यकर्त्यांनी असे हल्ले करणं निषेधार्थ आहे.
मा. किरीज जींनी केलेल्या आरोपांचे उत्तर द्या,
अशा भ्याड हल्ल्यांना ते घाबरणार नाहीत! pic.twitter.com/peJMlJnnWE— Prasad Lad (@PrasadLadInd) February 5, 2022
भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही ठाकरे सरकारवर आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. कर नाही, त्याला डर कशाचा! किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे सरकार असल्याचा दुरुपयोग असून, सत्ताधारी कार्यकर्त्यांनी असे हल्ले करणं निषेधार्थ आहे. किरीटजींनी केलेल्या आरोपांचे उत्तर द्या, अशा भ्याड हल्ल्यांना ते घाबरणार नाहीत!, असा इशाराच प्रसाद लाड यांनी शिवसेनेला दिलाय.
अमृता फडणवीसांचाही हल्लाबोल
कभी वाइन ने मारा,
कभी ट्रैफ़िक congestion ने मारा,
कभी वसूली ने मारा,
कभी तेरे goon ने मारा,ऐ चौपट राजा कैसी तेरी ख़ुदगर्ज़ी,
अपने ऐब छुपाने के लिए,
सच्चाई को तूने चुन चुनके मारा !Take care @KiritSomaiya ji ! https://t.co/kkJ58Am8rh
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 5, 2022
किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही शिवसेनेवर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केलीय. ‘कभी वाइन ने मारा, कभी ट्रैफ़िक congestion ने मारा, कभी वसूली ने मारा, कभी तेरे goon ने मारा, ऐ चौपट राजा कैसी तेरी ख़ुदगर्ज़ी, अपने ऐब छुपाने के लिए, सच्चाई को तूने चुन चुनके मारा!’, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय. तसंच किरीट सोमय्या यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या इशा-यावरून शिवसैनिकांनी हल्ला केलाय का? : चित्रा वाघ
जनतेसमोर शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचं पितळ उघडं पाडणा-या किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केलाय
इथं लोकशाही नव्हे ठोकशाही सुरूहे..
मुख्यमंत्री तर शेतीतलं बुजगावणं बनून राहीलेत
माझी मागणी आहे,मुख्यमंत्र्यांच्या
इशा-यावरून शिवसैनिकांनी हल्ला केलाय का याचा तपास व्हायला पाहीजे… https://t.co/IfE3fPVgnO— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 5, 2022
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच आरोप केलाय. जनतेसमोर शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचं पितळ उघडं पाडणा-या किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केलाय. इथं लोकशाही नव्हे ठोकशाही सुरू आहे. मुख्यमंत्री तर शेतीतलं बुजगावणं बनून राहीलेत. माझी मागणी आहे, मुख्यमंत्र्यांच्या इशा-यावरून शिवसैनिकांनी हल्ला केलाय का याचा तपास व्हायला पाहीजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केलीय.
पुणे महापालिका परिसरात नेमकं काय घडलं?
पुणे महापालिका परिसरात किरीट सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्यानंतर, महत्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांनी अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षक सोमय्यांना तिथून घेऊन निघाले. त्या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळ्याचं एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोमय्या यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.




