मनोरंजन

रविवारी रंगणार महाराष्ट्राज बेस्ट डान्सरचा महाअंतिम सोहळा 

मुंबई : गेले १६ आठवडे महाराष्ट्राज बेस्ट डान्सर हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि आता हा कार्यक्रम निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचला आहे. टॉप ५ स्पर्धांमधून एक कोण तरी बनणार महाराष्ट्राचा पहिला बेस्ट डान्सर.

धर्मेश सर आणि  पूजा सावंत यांनी या कार्यक्रमाचे परीक्षण केले आणि वेळोवेळी स्पर्धकांचे मार्गदर्शन केले. तर संकर्षण कऱ्हाडे आणि नम्रता संभेराव-आवटे या दोघांनी सूत्रसंचलनाची धुरा सांभाळली होती. एवढंच नव्हे तर कार्यक्रमाचे लिखाण देखील संकर्षण कऱ्हाडे यांनी केले होते आणि नम्रतानी मंचावर साकारलेल्या विविध भूमिकांमुळे कार्यक्रमाची रंगत अजून वाढली.

अनेक हुरहुन्नरी डान्सर्स या मंचाला लाभले पण ही स्पर्धा असल्याने त्यातील काहीच पुढे येऊ शकले आणि त्यातून दीपक हुलसुरे, प्रथमेश माने, प्राची प्रजापती, अदिती जाधव आणि अपेक्षा लोंढे हे स्पर्धक टॉप ५ पर्यंत पोहचले. आपल्या नृत्यांनी या पाचही जणांनी अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घातली आणि थोड्याच काळात सगळ्यांचे लाडके झाले.

सेमी फिनालेला गीता माँ नी देखील महाराष्ट्राज बेस्ट डान्सरच्या मंचावर हजेरी लावली आणि स्पर्धकांचा उत्साह वाढवला.  महाअंतिम सोहळ्याला महाराष्ट्राची लाडकी जोडी सचिनजी पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी हजेरी लावली.स्पर्धकांशी गप्पा मारताना त्यांनी आपल्या जुन्या आठवणी सर्वांना सांगितल्या, आपल्या अजरामर चित्रपटातील संवाद धनंजय माने इथेच राहतात का यावर त्यांनी स्पर्धक प्रथमेशला प्रथमेश माने इथेच राहतात का? असं लोक विचारतील इतका तू मोठा होशील असं देखील सांगितलं.सर्व स्पर्धकांना प्रोत्साहित केले आणि मंचावर जाऊन आशीर्वाद दिले.  स्पर्धकांचं नृत्य पाहून ते आनंदी आणि अचंबित झाले. एवढंच नाही तर सचिन पिळगावकर हे  मंचावर स्पर्धकांबरोबर थिरकले देखील.

महाअंतिम सोहळ्याला सर्व स्पर्धकांच्या आई वडिलांनी देखील उपस्थित होते.स्पर्धक दीपक हुलसुरे हा अतिशय हलाखीच्या परिस्थितून वर येऊन या मंचावर आणि टॉप ५ पर्यंत पोहचला आहे. यावेळी दीपकची गोष्ट ऐकून सुप्रिया पिळगावकर भावुक झाल्या आणि त्यांनी स्वतःच्या गळ्यातला हार काढून दीपकच्या आईंना भेट दिला. यावेळी दिपकच्या आईही भावुक झाल्या. यावेळी प्रेक्षक आणि दीपक हुलसुरेचे चाहते असलेले दीपक हाडे देखील आले होते आणि त्याला त्यांनी आपल्याकडे नोकरी देखील दिली. या मंचाने सगळ्यांनाच भरभरून दिल आणि त्यांची सर्व स्वप्न पूर्ण केली. पाहा, महाराष्ट्राज बेस्ट डान्सरचा महाअंतिम सोहळा १४ मार्च, रविवार संध्या. ७ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button