Top Newsराजकारण

नारायण राणेंसारखे भित्रे मंत्री नसल्यामुळे सरकार भक्कम; नवाब मलिकांचा पलटवार

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे. नारायण राणे तुमच्यासारखे भित्रे मंत्री आता राहिले नसल्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं वाटत नसल्याचे वक्तव्य केलं आहे. तसेच सरकारमधील मंत्र्यांकडून एकही राज्याच्या हिताचं काम होत नाही आहे. यावर नवाब मलिकांनी पलटवार केला असून नारायण राणे घाबरले असल्यामुळे भाजपमध्ये गेले आता तिकडे त्यांना बक्षीस दिल्यामुळे तोंडसुख घेत असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघात केला आहे. भाजपमधील नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे वारंवार बोलत राहिले की महाराष्ट्र सरकार हे टिकणार नाही. अधी १५ दिवस २ महिने आणि आता २ वर्ष हे तारखेवर तारखा देत राहिले. हे सरकार भक्कम आहे. नारायण राणे तुमच्यासारखे भित्रे मंत्री आता राहिले नाही असे मलिक म्हणाले. तसेच जे भित्रे होते ते गेले, आता कोणीही कितीही यंत्रणेचा वापर करुन लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम भाजप करत असेल तर आम्ही घाबरणार नाही. जे घाबरले त्यांनी पक्ष सोडला आता त्यांना काही बक्षीस पण मिळाले असेल पण हे महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष टीकेल आणि २५ वर्षे राहिल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केलं होते. आता जे घाबरट गेले त्यांना झोप येते आणि आम्ही लोकांची झोप उडवत आहोत असे नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक म्हणाले की, मी कधी कोणत्याही व्यक्तीच्या कुंटुंबाबाबत बोललो नाही. माझ्या जावयाला अडकवण्यात आल्यानंतर भाजपचे लोकं तोंडसुख घेत होते की नवाब मलिकांच्या जावयाचा ड्रग्जचा धंदा आहे. हर्बल टोबॅकोचा कसा उपयोग करतात आम्हाला सांगा, शरद पवार यांना पत्र लिहून विचारले की, ही किमया आम्हाला पण दाखवा, आता पावडरच्या पैशाने अल्बम होत असेल तर ते लोकांसमोर आणण हे योग्य नाही का? असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला होता. महाविकास आघाडीमधील नेत्यांची माहिती असल्याचे राणे म्हणाले यावर नवाब मलिकांनी घणाघात केला आहे. आमची माहिती सार्वजनिक करा आम्ही घाबरत नाही. मला चार ४ आहेत, ६ भाऊ, ४ बहिणी आहेत. त्यांनाही मुले आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही कोणाच्याही घरातल्यांवर टीका केली नाही. जर ड्रग्जच्या पैशांनी गाण्यांचा अल्बम बनवला तर त्यावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे घरातल्या व्यक्तींवर टीका करणं होत नाही असे नवाब मलिक म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button