इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांच्या पतीचे निधन

लंडन : इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. बकिंगहॅम पॅलेसकडून प्रिन्स फिलिप यांच्या निधनाची वृत्त देण्यात आले आहे. १० ते १५ दिवसांपूर्वी प्रिन्स फिलिप रुग्णालयातून घरी परतले होते. त्यांच्या हृद्यावर शस्त्रक्रिया झाली होती. बरेच दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. रुग्णालयातून आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत फारशी काही ठिक नव्हती.
बकिंगहॅम पॅलेसकडून प्रिन्स यांच्या निधनाबाबत एक पत्रक जाहीर करण्यात आले. आज सकाळी प्रिन्स फिलीप यांनी अखेरचा श्वास घेतला, असे राणी एलिझाबेथ यांनी सांगितले. प्रिन्स फिलिप यांना कोरोनाची लागण झाली होती. १६ फेब्रुवारीला त्यांना लंडनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर कोरोनाचे उपचार आणि हृदयावरील शस्त्रक्रिया पार पाडून १६ मार्चला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
१९४७ साली एलिझाबेथ दुसरी आणि प्रिन्स फिलिप यांचे लग्न झाले होते. सर्वात प्रदीर्घ काळसेवा देणारे ब्रिटीश राजघराण्यातील हे जोडपे ठरले आहे. प्रिन्स फिलिप यांच्या पश्चात्य राजकुमारी एलिझाबेथ, ४ मुले, ८ नातवंडे आणि १० पतवंडे आहेत. प्रिन्स यांच्या निधनाच्या वृत्तानंतर संपूर्ण ब्रिटनमध्ये राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच ब्रिटनमधील ऐतिहासिक इमारतीतील ब्रिटीश झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.